डॉ. बी. एन. पुरंदरे महाविद्यालयात विज्ञान विभागात प्रकल्प स्पर्धेचे आयोजन

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,एज्युकेशन ट्रस्टचे बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयात ” द रिचर्ड फेनमन फिझीक्स क्लब ” भौतिकशास्त्र विभागातर्फे सालाबादप्रमाणे विज्ञान प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास पाटील आणि परिक्षा विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र देवरे यानी केले. या प्रकल्प स्पर्धेच्या आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प, पोस्टर्स व वैज्ञानिकांचे रेखाचित्र सह त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दलचे सादरीकरण केले. रोबो स्पायडर, रोबो मॅन, वायरलेस कम्युनिकेशन, न्यूटनचे क्रेडल, लोहचुंबकाशी संबंधितले प्रयोग इत्यादी ३० प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. डॉ. एस. मित्रा आणि प्रा. प्रतीक्षा उईके यांनी स्पर्धेतील प्रकल्पांचे परीक्षक म्हणून काम पाहिले. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी या स्पर्धेतील प्रकल्प समजावून घेतले. सदर भौतिकशास्त्र प्रकल्पाचे आयोजन डॉ. अमर काटकर व विभागप्रमुख प्रा. रंजू बाला यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page