लोणावळा नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात,राजेंद्र सोनवणे नगराध्यक्ष पदी तर १६ नगरसेवक विजयी,भाजप ची ४ नगरसेवक विजयी

मावळ मराठा न्युज -लोणावळा, लोणावळ्यात भाजप चा बालेकिल्ला ढासळला,लोणावळा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी १० हजार ६८१ मतांच्या फरकाने मोठा विजय मिळवला आहे. अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या लोणावळा नगरपालिकेवर राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने नगरपालिकेवर आपला एकहाती सत्ता स्थापन केली आहे. लोणावळा नगरपालिका निवडणुकीच्या निकाल आज २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या १६ जागा,भाजप ४,शिवसेना १, काँग्रेस ३,अपक्ष ३ असे लोणावळा नगरपरिषद मधील पक्षीय बलाबल आहे.माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीच्या आरती तिकोने यांनी ४८४ मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला, सुरेखा जाधव यांना १,०२६ तर आरती तिकोने यांना १,५१० मते मिळाली.प्रभाग क्रमांक ५ मधील लढतीमध्ये भाजपचे सुभाष डेनकर विजयी झाले आहेत. या प्रभागात राष्ट्रवादीचे मुकेश परमार आणि भाजपचे सुभाष डेनकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. मुकेश परमार यांनी सुभाष डेनकर यांच्यात मोठी लढत होती, डेनकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती, परंतु मतदारांनी स्थानिक मराठा उमेदवार असलेल्या सुभाष डेनकर यांना विजयी केलं.राजू बच्चे यांना २० वर्षांनी पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीच्या मंगेश मावकर यांनी बच्चे यांचा पराभव केला, तर माजी नगरसेविका रचना सिनकर, बिंदा गणात्रा, सिंधू परदेशी,माजी उपनगराध्यक्ष भरत हरपुडे, माजी नगरसेविका कल्पना आखाडे यांना पराभव पत्कारावा लागला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page