पिकअप गाडीसह तीन लाख रुपयाचे गोमांस कोतवाली पोलीसांनी मध्यरात्री पकडले

मावळ मराठा न्यूज:- अहमदनगर, प्रतिनिधी:-दि.४ मार्च रोजी रात्री ०२.३० वाजण्याचे सुमारास कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की,अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरामधुन अज्ञात इसम हा कत्तल केलेल्या गोवंश जातीचे गोमांस विक्री करण्याचे उद्देशाने वाहनामधुन गोमांस घेवून जाणार आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी रात्रगस्तीवर असलेले पोसई महाजन,पो.कॉ.अभय कदम,पो.कॉ. कांबळे,पोकॉ सायकर यांना सदरबाबत माहिती कळवुन खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे पोसई मनोज महाजन यांनी पथकासह झेंडीगेट परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते अशोका हॉटेलकडे जाणारे रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढ-या रंगाचा एक पिकअप क्रमांक एमएच २०. ईएल.३४८७ संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पोसई महाजन व पथकाने सदर पिकअप वाहनास थांबवून त्यावरील चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव- मिर्झा शकील बेग (वय ४५ वर्षे रा. कैलासनगर,दादा कॉलनी, औरंगाबाद) असे असल्याचे सांगीतले त्यास त्याचे गाडी मधील काय माल असल्याबाबत विचारपुस करता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्या पिकअप वाहनामध्ये ३,००,०००/-रु किंमतीचे लहान मोठे आकाराचे गोमांस व गोवंशीय जनावराचे हाडे असे एकुन अंदाजे १,५०० किलो वजनाचे गोमांस व हाडे तसेच २,५०,०००/- रु किंचा पांढ-या रंगाचा पिकअप असा एकुन ५,५०,०००/-रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून त्याचे विरुध्द कोतवाली पोस्टे गुरनं २०८/२०२३ भादंवि कलम २६९,महाराष्ट्र प्राणी सरंक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ), (क), ९ (अ) प्रमाणे पोकाँ अतुल काजळे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोना/अब्दुलकादर परवेज इनामदार हे करीत आहेत.सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई मनोज महाजन,पोकॉ/अभय कदम,पोकॉ/अतुल काजळे,पोकॉ/कांबळे,पोकॉ/अशोक सायकर यांनी केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page