भोसरीगांवचे पैलवान काळुराम लांडगे मुंबई येथे “राष्ट्रपिता महात्मा गांधी सद्गभावना समाजभूषण पुरस्कार २०२५” ने सन्मानित

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1,”square_fit”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

मावळ मराठा न्युज नेटवर्क-आज दि.०५.१०.२०२५ प्रेस क्लब मुंबई,पत्रकार भवन,आझाद मैदाना जवळ नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मैत्री संस्था व युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या गौरवशाली जयंती निमित्त सामाजिक,साहित्य,कला,क्रिडा,शैक्षणिक, सहकार ,पत्रकार ,उद्योक ,राजकिय , सांस्कृतिक,धार्मिक,पर्यावरण,आरोग्य विषयक आदी क्षेत्रात विशेष व उल्लेखनिय कार्य करत असल्यामुळे कासारवाडी येथील पैलवान काळुराम लांडगे यांना राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी सामाजिक सेवा क्षेत्रात उल्लेखनिय कार्याचा गौरव म्हणुन संस्थेने ” राष्ट्रपिता महात्मा गांधी सद्गभावना समाजभूषण पुरस्कार २०२५ “मान्यवर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य व IPS मा.पोलीस महासंचालक मा.सुधाकर सुराडकर साहेब ,मातृतिर्थ शिंदखेडराजा राजे लखोजी जाधवराव यांचे थेट १४ वे वंशज आणि राजमाता मा साहेब जिजाऊ यांचे थेट १४ वे वंशज मा.संभाजीराव राजे जाधवराव,प्रसिद्ध कामगार नेते मा.महेंद्रजी घरत,फिल्म सेंसॉर बोर्ड भारत सरकारचे मा.सदस्य मा.विलास खानोलकर यांच्या शुभहस्ते गौरव चिन्ह, सन्मानपत्र,शाल देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळी मराठी सिने-नाट्य अभिनेत्री मा.रंजीता पाटील,पोलीस मित्र व समाजभूषण मा.दिलीप नारद,आदर्श शिक्षिका मा.स्पृहा सुरेश इंदु , शिवश्री व समाजसेवक विजय भोसले , प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.संतोष तांबे उपस्थित होते कार्यक्रम संपूर्ण पारपाडण्यासाठी मैत्री संस्थेचे अध्यक्ष मा.सुरज भोईर व त्यांच्या टिमने भरपुर प्रयत्न केले.कार्यक्रमाला पुरस्कार्थी व त्यांचे नातेवाईक, नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page