भाजप,राष्ट्रवादी ची दिशा आमदार सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांनी केली आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट








मावळ मराठा न्युज -तळेगाव,मावळ चे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती असा गौप्यस्फोट करत बाळा भेगडे आणि सुनील शेळके हे दोघे मामा भाचे जनतेला मामा बनवित आहेत का? सवाल करत सांगितलं तो किस्सा.विधान सभा निवडणूक २०१९ ला सुनील शेळके यांना भाजप ने तिकीट नकारल ते राष्ट्रवादीत गेले आणि पहिला फोन सुनील नी मला केला मी राष्ट्रवादी गेलो तुला पण भाजप चे तिकीट मिळणार नाही तुही राष्ट्रवादी मध्ये ये पण मी नाही आलो.सुनील शेळके राष्ट्रवादी मध्ये गेला त्यांचे चांगले झाले आणि मी भाजपत राहिलो माझेही चांगले झाले. असे सांगत मोहोळ यांनी गौप्यस्फोट केला.
मावळ तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीसाठी मी बाळाभाऊकडे एक हात पुढे करतो जर तुमची तयारी असेल तर यावर स्पष्ट उत्तर न देता बाळा भेगडे यांनी आम्ही दोन्ही हात द्यायला तयार आहोत.सर्व निवडणुका बिनविरोध करून वाचलेला खर्चात महिलाना विमानाने प्रवासाचा खर्च करता येईल असं उत्तर देऊन माझा विरोध कायम राहिल असच अप्रत्यक्ष सांगितले.



