ओवळे गावातील दिव्यांग युवकाने शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांची पुजा करण्यासाठी प्रयागराज वरून आणले गंगाजल



मावळ मराठा न्युज – मावळ,ओवळे गावातील दिव्यांग युवकाने शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची पुजा करण्यासाठी प्रयागराज चा १२८२ किमी प्रवास करून आणले गंगाजल.छत्रपती शिवाजी महारांजाना गंगाजल अर्पण करून केले शिवपुजन.ओवळे गावातील शिवभक्त अजित भाऊ शिंदे ह्या दिव्यांग युवकाने ओवळे ते प्रयागराज असा सुमारे १२८२ किमी प्रवास करत शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची पुजा करण्यासाठी प्रयागराज येथील गंगा,यमुना,सरस्वती ह्या त्रिवेणी संगमातुन गंगाजल आणले. गंगाजल हे अंत्यत पवित्र जल मानले जाते.ते अमृतासमान असते.गंगाजलाने देवांची पुजा केली जाते. अजित शिंदे यांनी स्वतः त्यांच्या घरासमोर छोटेसे शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले आहे. दि.१९ फ्रेबुवारी २०२५ रोजी शिवजयंती निमित्त अजित शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गंगाजल वाहिले . व नारळ,पुष्पहार,फुले अर्पण करत शिवाजी महाराजांचे पुजन करुन शिवजयंती साजरी केली.ह्या कृतीतुन अजित शिंदे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम,आदर,निष्ठा,श्रद्धा दिसुन येते.शिवजयंती ही फक्त मंदिरात,गावागावातच नाहीतर प्रत्येकाच्या घराघरात साजरी झाली पाहिजे.शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. आज त्यांच्यामुळेच मंदिरात देव आहे. शिवाजी महाराज नसते तर,नसती दिसली अंगणात तुळस,नसते दिसले मंदिराचे कळस,नसते दिसले सुवासिनींच्या कुंकू भाळी असे मत अजित शिंदे यांनी व्यक्त केले.




