भांगरवाडी येथे महिला वेलनेस फेस्टिव्हल २०२६ ची उत्साहात सुरुवात








मावळ मराठा न्युज – लोणावळा, ८ मार्च २०२६ :आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुक्श्मा योग फाउंडेशन यांच्या वतीने, लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या सहकार्याने महिला वेलनेस फेस्टिव्हल २०२६ या आठ दिवसीय आरोग्य उपक्रमाचे भांगारवाडी येथील सुमित्रा हॉल येथे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम ८ मार्च ते १५ मार्च २०२६ दरम्यान दररोज सायंकाळी ४.०० ते ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सौ. सुरेखा ताई जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याच वेळी उपस्थितांनी त्यांचा वाढदिवस केक कापून आनंदात साजरा केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.या उपक्रमाद्वारे पीसीओडी, पीसीओएस, हार्मोनल असंतुलन, हृदयविकार तसेच महिलांच्या सर्वांगीण आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा उद्देश आहे. या आठ दिवसांच्या महोत्सवात दररोज १.३० तासांचे योग व आरोग्य सत्र आयोजित करण्यात येणार असून यामध्ये विविध तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.या कार्यक्रमात डॉ. विकास चोथे, सौ. पूजा कुलकर्णी आणि पंकज शर्मा (संस्थापक व अध्यक्ष, सुक्श्मा योग फाउंडेशन) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.या उपक्रमाचे नेतृत्व पंकज शर्मा (संस्थापक / अध्यक्ष) करीत असून त्यांच्या सोबत सुक्श्मा योग फाउंडेशन ची टीम कार्यरत आहे. यात रिचा (लीड ट्रेनर), निकिता शर्मा (योग प्रशिक्षक), अनीता मानकर (योग प्रशिक्षक), विप्रा चौहान (योग प्रशिक्षक) तसेच प्रिया मेहता, मोनी मिश्रा आणि सोनाली तळेगावकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले.हा उपक्रम लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला असून उद्घाटन प्रसंगी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्येअध्यक्ष – लायन साधना तातियासचिव – लायन सारिका अग्रवालखजिनदार – लायन सुमित भदेशियाॲक्टिव्हिटी चेअरपर्सन – लायन सारिका सुराणाहे उपस्थित होते.या ८ दिवसीय महिला वेलनेस फेस्टिव्हलचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :दिवस १ : उद्घाटन समारंभदिवस २ : पीसीओडी व पीसीओएस साठी योगदिवस ३ : हृदयविकार प्रतिबंधासाठी योगदिवस ४ : झुंबा सत्रदिवस ५ : आहार व पोषण मार्गदर्शनदिवस ६ : आयुर्वेद मार्गदर्शनदिवस ७ : हिप्नोथेरपी सत्रदिवस ८ : समारोप समारंभया उपक्रमाद्वारे सुक्श्मा योग फाउंडेशन महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे कार्य सातत्याने करत आहे.



