स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वाना आमदार सुनील शेळकेच का हवेत ? स्थानिक नेतृत्वाचा अभाव आहे का?

मावळ मराठा न्युज -लोणावळा,स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर नेतृत्व का उभं केलं जात नाही,सर्वच ठिकाणी आणि सर्वांनांच आमदार आणि खासदारच का हवेत. वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या गटार,रस्ता,पाणी आणि वीज या विषयांनावरच लढवल्या जातात. त्यामुळे त्या सुविधा आणि त्याबाबतीतील समस्या सोडवण्यासाठी आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी येत नसतात.स्थानिक प्रश्न सोडवण्याची ज्या उमेदवार मध्ये ते प्रश्न सोडविण्याची धमक असेल तोच त्या शहरासाठी लायक आणि पात्र उमेदवार असतो. परंतु मावळ तालुक्यात मात्र सध्या वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे.ते याआधी कधीही नव्हते. आम्ही सुद्धा गेली २५ वर्षें मावळातील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणूका जवळून पाहत आलो आहोत. आता सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार यांना आमदार आणि खासदार यांच्या फोटो लावावा लागतो. हे स्थानिक पातळीवरील नेतृवाचे अपयश म्हणावे लागेल. कोणी म्हणेल याचा पत्ता कट म्हणजे पत्ता कट होत नसतो.ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे.इकडे फक्त धमक असेल तोच निवडून येतो. तसा सक्षम पर्याय तरी द्यावा लागतो. लोक प्रतिनिधीला लोक समस्या याची सोडवणूक करणारा नगरसेवक हवा असतो. काही शिवसैनिक, भाजप, शरद पवार गटातील काही, काँग्रेस मधील इच्छुक उमेदवार आमदार यांच्या कडे तिकीट मिळावं म्हणून चपला जिझवता आहेत. यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं? लोकसभा,विधानसभा यासाठीच कार्यक्षेत्र मोठं असतं. त्यामुळे मतदारांची संख्या देखील मोठी असते,काही लाखात असते.परंतु नगरपरिषद, नगरपंचायत यासाठी कार्यक्षेत्र खूप लहान असतं एका वॉर्ड मध्ये असणाऱ्या तीन ते चार हजार लोकसंख्या असते त्यामुळे एक एक मत खूप महत्वाचे असते.लोणावळा वडगांव आणि तळेगाव येथे स्थानिक नेतृत्वाला कां प्रोत्साहन दिले जात नाही. आणि स्थानिक नेतृत्व वर तोंड काढायला लागले की त्याला कां संपवले जाते. असा प्रश्न सर्व सामान्य माणसाला नक्कीच पडतो. फक्त आमदारांवरच का अवलंबून राहवं लागत ही स्थानिक नेतृत्वासाठी मोठी शोकांतिका आहे. लोणावळ्यात गेली पाच वर्ष उत्तम काम केलेली आणि स्वच्छता अभियानात देश पातळी वर अव्वल स्थान मिळवलेलं नेतृत्व म्हणजे माजी नगरध्यक्षा सुरेखा जाधव यांनी लोणावळ्यात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून लोणावळ्यासाठी काय चांगलं? आणि लोणावळ्याचे हित सांभाळणाऱ्या चांगल्या उमेदवारांची म्हणजे मग ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांची मोट बांधून विकास आघाडी वैगरे करून एक वेगळा प्रयोग करावा अशी अपेक्षा देखील लोणावळेकर नागरिक व्यक्त करीत आहेत.नगराध्यक्ष पद हे शेड्युल कास्ट साठी असल्याने त्यासाठी एवढा उत्साह मात्र लोणावळ्यात दिसत नाही तेच मात्र खुल्या गटा साठी असतं तर बैठका आणि मोर्चेबांधणी ला वेग आला असता.असो.सर्वच पक्षातील इच्छुक सध्या आमदार सुनील शेळके यांचे फोटो लावताना दिसत आहेत. आणि आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर बसले आहेत. आणि आमदार शेळके हे प्रत्येकाला उमेदवारी देऊ शकणार नाही,तेव्हा जो बंडखोरीचा भडका उडेल तोही पाहण्यासारखा असणार आहे. पाहू या घोडा मैदान लांब नाही.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page