शिवसेनेचा ५९ वा वर्धापनदिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोणावळा शहर यांच्या वतीने वह्या व खाऊ वाटप

मावळ मराठा न्यूज – लोणावळा,हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या शिवसेनेचा आज ५९ वा वर्धापनदिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोणावळा शहर यांच्या वतीने साजरा करण्यात आला.या निमित्ताने शिवसेना लोणावळा शहर प्रमुख श्री परेश भाऊ बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा येथील संत गाडगेबाबा प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक १० येथील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आला.यावेळी पुढील प्रमुख पाहुणे उपस्थित होते.पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी सह-संपर्कप्रमुख श्रीमती शादान भाभी चौधरी, शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, तालुका प्रमुख आशीष भाऊ ठोंबरे, शहरप्रमुख परेश बडेकर,तालुका सल्लागार मारुती खोले,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, विभाग प्रमुख संजय शिंदे, सुनील जाधव,अशोक गवारणे, महिला आघाडी उपशहर संघटीका सुरेखा देवकर,प्रतीभा कालेकर, उर्मिला शर्मा मा.युवती सेना शहर अधीकारी सना चौधरी साळुंके , खंडाळा जेष्ठ नागरिक संघाचे गोपीचंद सोनवणे,वसंत कदम, शाखाप्रमुख जीतु ठोंबरे,तसेच धीरज घारे, कुणाल सपकाल,सत्तार शेख,आमीत पंचमुख ,जयवंत ठाकुर,धोंडीबा मावकर इ. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page