प्राथमिक आरोग्य केंद्र,कार्ला येथे जन औषधी दिवस” साजरा

मावळ मराठा न्यूज: – कार्ला,आज दि.०६/०३/२०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला अंतर्गत येणाऱ्या आयुष्यमान भारत-आरोग्यवर्धिनी उपकेंद्र टाकवे खुर्द येथे देशाचे लाडके पंतप्रधान मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी , आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ,भारत सरकार यांच्या संकल्पनेतुन “जन औषधी दिवस” साजरा करण्यात आला. उपकेंद्र टाकवे खुर्द कार्यक्षेत्रातील उच्च रक्तदाब व मधुमेहाचे रूग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांचे जेनेरिक औषधी वापरा बद्दल समुपदेशन करण्यात आले. तसेच त्यांना महिनाभर पुरेल एवढी BP व Diabetes ची जेनेरिक औषधे देण्यात आली. जिल्यातील सर्व हेल्थ वेलनेस सेंटर व नजीकच्या जेनेरिक मेडिकल स्टोर मध्ये औषधे मिळणार असून यामुळे रुग्णांना फायदा होणार आहे. जण औषधी दिवस साजरा करतेवेळी टाकवे गावचे विद्यमान सरपंच तुशांत ढमाले, ग्रामसेवक सौ. मनीषा ओतरी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. चेतन पवार, आरोग्य सेवक प्रसाद बिराजदार, आशा वर्कर सौ. आरती गरुड, श्रीमती. जयश्री मोरे, सौ. सीमा थोरात व इतर ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page