पार्थ पवारला हरवणाऱ्या श्रीरंग बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आली आहे – रोहित पवार

मावळ मराठा न्युज :-पिंपरी,अजित पवार हे या सर्व गोष्टी विसरले असतील. मला पार्थला सांगायचं आहे. या गोष्टी मी विसरलो नाही. ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला. त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी तुझा भाऊ इथं आलेला आहे. २०१९ मध्ये मावळ लोकसभेत अजित पवारांना मोठा धक्का बसला होता. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. मात्र, आता तेच अजित पवार श्रीरंग बारणेंचा प्रचार करताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. ते पिंपरीत पत्रकारांशी बोलत होते.रोहित पवार म्हणाले की, संजोग वाघेरे यांच्या बाजूने आजचे वातावरण आहे. वाघेरे हे नवीन खासदार असतील. अजित पवार हे शरद पवार यांना वडील मानायचे. त्यांना सोडून स्वतःच साम्राज्य आणि कारवाईपासून लपून राहण्यासाठी महायुती आणि भाजपसोबत अजित पवार गेले आहेत. अजित पवारांनी वडिलांचा विचार केला नाही. ज्या व्यक्तीने मुलाचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला,त्या गोष्टी विसरून ज्या उमेदवाराने पराभव केला त्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार येत असतील तर यावरूनच अजित पवारांची परिस्थिती किती दयनीय आहे हे दिसून येते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page