कै.सचिन रहाळकर यांचे स्मरणार्थ लोणावळ्यात “असे घडले शिवबा” ही स्पर्धा उत्साहात संपन्न







मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिनांक १२ नोव्हेंबर रोजी श्रिया रहाळकर यांनी त्यांचे पती कै.सचिन रहाळकर यांचे स्मरणार्थ “श्री शिवाजी महाराज यांच्या गोष्टी” ही स्पर्धा आयोजित केली होती. अतिशय आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली होती. ज्यामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होऊन चांगले संस्कार घडतील.
मूळ उद्देश लहान मुलांना शिवचरित्र गोष्टीरूपाने समजावे. तसेच सभाधिटपणा यावा, स्मरणशक्तीचा ही विकास होऊन बुद्धी तल्लख होईल. या मध्ये राष्ट्रसेविका समिती निवेदिता शाखा लोणावळा यांचे ही योगदान होते.
श्री माधव भोंडे व सौं राधिका भोंडे यांनी कार्यक्रमासाठी ऍड बापूसाहेब भोंडे शाळा उपलब्ध करून दिली व विशेष सहकार्य केले. तसेच माजी नगरसेविका सौ. ब्रिंदा गणात्रा आणि लायन्स सुप्रिमोचे अध्यक्ष श्री. अमीन वाडीवाला आणि सहकारी ह्याचेही उत्तम सहकार्य लाभले.अनेक मान्यवरांचेही आशीर्वाद लाभले. श्री धीरूभाई कल्याणजी टेलर, राजेश जी मेहता, अनिल भाऊ गायकवाड, बापू तारे , आशिष मेहता, मृदुला पाटील, रश्मी शिरस्कार, श्री व सौ. बन्सल, सुनीता रावण.
विविध शाळातून स्पर्धेसाठी विद्यार्थी आले होते.
जवळपास ९० विद्यार्थी त्यांचे पालक, तसेंच शिक्षक उपस्थित होते.
सहभागी झालेल्या प्रत्येकाला आकर्षक भेट वस्तू, खाऊ आणि विजेत्यांना प्रथम द्वितीय तृतीय आणि प्रत्येक गटात २ उत्तेजनार्थ बक्षिसे दिली.
तीन गटात स्पर्धा झाल्या. ०१ ते ०४ थी, ०५ वी ते ०७ वी, ०८ वी ते १० वी.
प्रथम क्र. (१ -४ ) जान्हवी जगताप. (५ -७ ) विराज निवृत्ती चौरे. (८ -१० ) क्रिया.
द्वितीय क्र. (१ -४ ) अवधूत धाकोळ. (५ -७ ) आराध्या हांडे. . (८ -१० ) रुद्र शिंदे.
तृतीय क्र. (१ -४ ) मृणाल गोंधळी (५ -७ ) सर्वेश शिंदे (८ -१० ) समवड्या साबळे.
उत्तेजनार्थ… (१ -४ ) तरुण मराठे आणि काव्या दाभाडे.
(५ -७ ) श्रीहरी चातंत्रा आणि प्रांजल घोडके.
(८ -१० ) श्रद्धा उपाध्याय आणि जिया राजपुरोहित. अत्यंत अभ्यासपूर्वक, स्पष्ट शब्दोच्चlर आणि ओघावत्या वाणीत अनेकांनी शिवाजी महाराजांच्या गोष्टीं सांगून श्रोत्यांची मने जिंकली.स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री आनंद गावडे, श्री महेश थत्ते,श्री विश्वनाथ पुट्टोल लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा कोपरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुनील कोपरकर यांनी सहकार्य केले.
अश्या कार्यक्रमांमुळे विचारांना उजाळा मिळतो, थोर व्यक्तिमत्व त्यांचे विचार, पराक्रम, देशभक्ती ह्या मूल्यांचा सहजच मुलांच्या मनावर संस्कार होतो. आणि नक्कीच यातून भावी पिढीस प्रेरणा व प्रोत्साहन मिळते, अशी भावना श्रोतृवर्गाच्या मनात होती.
अश्या रीतीने ‘असे घडले शिवबा ‘हा छान छान गोष्टींचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात संपन्न झाला.



