पिंपळे गुरव येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबिर संपन्न


मावळ मराठा न्यूज:- पिंपळे गुरव, महाराष्ट्र राज्य शासन आयोजित व्यवसाय शिक्षण रोजगार उद्येजकता व नाविन्य त विभाग महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनलय महा राष्ट्र राज्य शासकीय औ्द्येगिक प्रशिक्षण संस्था वतीने एक दिवसीय छत्र पती शाहू महाराज युवा शक्ती करअर शिबिर नुकतेच पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरचे उद्घाटन आमदार अश्विनी जगताप याच्या हस्ते कारन्यात आले. यावेळी उद्घाटन प्रसंगी व्यापीठावर डी जी चौगुले ( आय जी डब्लु) ,एच आर सूर्यवंशी तज्ञ प्रशिक्षक (उदयेेजकता विकास),शिरीष वरुडकर ,भगवान पांडेकर ,नरेंद्र कुमार चौधरी तज्ञ प्रशिक्षक,एस डी साबळे( प्राचार्य औद्यीगिक प्रशिक्षण संस्था ,बी आर शिंपले (व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी) वाय पी पारगावकर ( सह संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यलय) उपस्थित होते. शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबिरातील सत्रात एच आर सूर्य वंशी तद्य प्रशिक्षक( उदयेजकता विकास) यानी मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थीनी व्यवसाय सुरू करताना मनाशी पक्का विचार करावा. कोणताही व्यवसाय सुरू करताना अप यशाची भीती बाळगू नका. उद्येग सुरू करताना कौशल्य आत्मसात करा.एखादा उद्ये ग सुरू करण्यासाठी वय आणि इंग्रजी भाषेची गरज भासत नाही.विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी नंतर योग्य नियोजन करा. असे मार्गदर्शन उपस्थितांना यावेळी केले.भाषणात उदयेग विश्वातील उदाहरण दिली. शिबिरात पुढे शिरीष वरुडकर तज्ञ प्रशिक्षकांनी सहभागी शिबिरार्थिना ऑफ बीट करीअर विषयी माहिती दिली. रोजच्या दैन दिनी जीवनात पेसे कमविण्यासाठी करीअर निश्चित करताना आपल्याला नोकरी किंवा उद्येआग सुरू करावा. समाजा साठी गरजू व्यवसाय उभे करावेत. यात आपलयाला स्वत मार्केटिंग करता आले पाहिजे.बँकिंग इन्शुरन्स ,आय टी कपन्या विविध गोष्टीची गरज भासते. यात विचार करत ऑफ बीट व्यवसाय सुरू करता येत असल्याचे सांगत त्यांनी नारायण मूर्ती ,बिल गेटस यांची ऑफ बीट करीअर यशस्वी उदाहरणे दिली.यानंतर भगवान पांडेकर यानी कलमापन चाचणी या विषयावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्याच्या क्षमता आणि आवड कल ओळखण्या करिता कल चाचणी आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यकमाचे सूत्रसंचालन संतोष गुरव यानी केले.यावेळी पालक आणि मुलांनी शिबिरात लक्षणीय सहभाग नोदवला होता.




