हिंदू धर्माच्या आचार्य सभेच्या ९व्या अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न;अधिवेशनात लोणावळ्यातील गणात्रा कुटुंब यांची उपस्थिती

मावळ मराठा न्यूज- हिंदू धर्माच्या आचार्य सभेच्या ९व्या अधिवेशनात सहभागी होण्याची संधी मिळणे हा गणात्रा कुटुंबासाठी खरोखरच मोठा सौभाग्याचा क्षण होता असे लोणावळ्यातील उद्योजक आशिषजी गणात्रा यांनी सांगितले. या प्रसंगी भारताचे गृह मंत्री अमित शाह जी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे अध्यक्ष मोहन भागवत जी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत अध्यात्म, सनातन धर्म, सामाजिक समरसता आणि राष्ट्रउन्नती यांसारख्या विषयांवर सखोल चिंतन अनुभवण्याची संधी मिळाली। हे अधिवेशन जुना पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जगद्गुरु स्वामी डॉ. निर्मलानंदनाथ महास्वामीजी यांच्या नेतृत्वात पार पडले. तसेच आचार्य सभेचे महासचिव व संयोजक स्वामी परमतमानंद सरस्वती जी यांच्या कुशल संयोजनामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page