श्री दत्ता म्हात्रे सर व साईनाथ क्रिडा मंडळ मंत्रीवाडी यांच्या मार्फत “विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा २०२६”चे आयोजन







मावळ मराठा न्युज -पेण (पी.डी. पाटील ) आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आयुष्यात उत्तुंग झेप घेण्यासाठी निघालेल्या पाखरांच्या पंखांना बळ देण्यासाठी त्यांना भावी आयुष्याच्या वाटा दाखवून स्वतःची वाट निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये जिद्द, प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने तसेच अनेक साधनांचा अभाव असताना अविश्रांत मेहनत करत आपल्या आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पंचक्रोशीतील इ. १० वी ते १२ वी. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसहित पालकांचा सन्मान करण्यासाठी श्री दत्ता म्हात्रे सर व साईनाथ क्रिडा मंडळ मंत्रीवाडी यांनी ” विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा २०२६” चे आयोजन केले आहे.हा दिनांक २४ मे रोजी सायंकाळी ठिक ६ वा. मंत्रीवाडी (पेण- रायगड) याठिकाणी पार पडणार आहे. या कार्यक्रमात प्रमोद जाधव सर (सांगली) MPSC परिक्षा उत्तीर्ण (कर सहाय्यक व महसुल पदी नियुक्ती) आणि मा. मोहिनी थोरात All India Ranking 76 GATE CSE 2025 (IIT MUMBAI)मुख्य मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. अतुल नंदकुमार म्हात्रे (मास्टर ऑफ आर्किटेक्ट, लंडन), श्री. प्रभाकर म्हात्रे साहेब (रायगड जि.प. सदस्य), श्री. मिलिंद पाटील साहेब (सामाजिक कार्यकर्ते),श्री. समीर म्हात्रे साहेब (उपाध्यक्ष-सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्तान), सौ. मनिषा मंगलदास ठाकूर (सरपंच-ग्रु.ग्रा.पं. दिव),श्री. विवेक म्हात्रे साहेब (गटनेते पंचायत समिती, पेण) श्री. संताजी का. पाटील (सामाजिक कार्यकर्ते), डॉ. सुभाष लक्ष्मण म्हात्रे (डॉक्टरेट मंत्रीवाडी) श्री. मंगलदास ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते), श्री. सचिन पाटील(उप सरपंच- ग्रु .ग्रा.पं. दिव),श्री. प्रफुल्ल म्हात्रे (मा. सभापती सदस्य ग्रुप .ग्रा. दिव) श्री. सुजित म्हात्रे(मा. सदस्य ग्रु.ग्रा. वढाव), सौ. करिष्मा सं. म्हात्रे (सदस्या-ग्रु.ग्रा.पं. दिव) सौ. सुप्रिया पाटील(सरपंच-सु.ग्रा.पं. बोरझे ), श्री. रत्नाकर ठाकूर साहेब (रायगड भूषण), श्री. अविनाश पाटील (निवृत्त मुख्याध्यापक काळेश्री), श्री. कृष्णा लांगी (ग्रामसेवक),श्री. शरद म्हात्रे (प्रो. सेरिमा हॉटेल),डॉ. आशिर्वाद मोकल (बेनवले),श्री. प्रकाश माळी (पत्रकार),श्री. संभाजी पाटील (उपसरपंच-गु.ग्रा.पं.बोरझे ),सौ. प्रणया सिद्धांत पाटील (उरण) श्री. रामकृष्ण ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते),श्री. जितेंद्र ठाकूर (अध्यक्ष छावा संघटना) श्री. प्रकाश ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते),सौ. अर्चना मोहन म्हात्रे (मा. सदस्या गु.ग्रा.पं.बोरझे ), श्री. वैभव म्हात्रे (वढाव) श्री. संतोष म्हात्रे (सामाजिक कार्यकर्ते),श्री. जितेंद्र पाटील सर (खारपाले) श्री. पंकज पाटील (पत्रकार ), श्री. अविनाश गुरुजी (रा.जि.प. शाळा, नारवेल), श्री. संजय ठाकूर, श्री. एस. के. ठाकूर सर (शिक्षक ठाकूर बेडी), श्री. मनोज ठाकूर (शिक्षक-ठाकूर बेडी), श्री. दयानंद ठाकूर (शिक्षक-ठाकूर बेडी), श्री. विजय ठाकूर (शिक्षक-ठाकूर बेडी), श्री. प्रल्हाद ठाकूर (शिक्षक-ठाकूर बेडी), श्री. संतोष पाटील (शिक्षक-घोडा बंदर) लाभणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी श्री. सुधाकर म्हात्रे (अध्यक्ष ट्रॉफी फायटर फाऊंडेशन), श्री. गंगाराम म्हात्रे,श्री. रुपेश पाटील, श्री. सत्यविजय ठाकूर, श्री. सुहास म्हात्रे (कान्होबा) यांचे विशेष सहकार्य लाभेल तर ग्रामस्थ मंडळ मंत्रीवाडी व महिला मंडळ मंत्रीवाडी यांचे विशेष पाठबळ असणार आहे. तेव्हा एक सामाजिक उद्दिष्ट समोर ठेऊन दत्ता म्हात्रे सर व साईनाथ क्रिडा मंडळ मंत्रीवाडी यांनी आयोजित केलेल्या सदर कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहून त्यांचा उत्साह वाढवावा आणि सन्मानासोबत करिअर दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या सुवर्ण संधीचा पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळविले आहे.



