मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘महा रोड शो’ने श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची सांगता

मावळ मराठा न्युज :-चिंचवड, दि. १० मे – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी, मनसे,आरपीआय,रासप,मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी- चिंचवड शहरात महा रोड शो निमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले बारणे यांच्या प्रचाराची सांगता होईल. बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः उपस्थित राहिले होते. त्यावेळी मिरवणुकीत देखील ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते प्रचाराच्या सांगतेसाठी पुन्हा मावळ मतदारसंघात आल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.चिंचवड येथील चापेकर चौकातून सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांच्या महा रोड शोचा प्रारंभ झाला . चिंचवड गावातील पॉवर हाऊस चौक, लिंक रोड, तानाजी गावडे चौक, भाटनगर, इंदिरा गांधी उड्डाणपूल, शगुन चौक, साई चौक, गुरुद्वारा, जयहिंद स्कूल चौक, काळेवाडी नदी पूल, काळेवाडी रोड, पंचनाथ चौक, एम एम स्कूल, बीआरटी रोड, तापकीर चौक, रहाटणी चौक, काळेवाडी फाटा, बेलठीकानगर १६ नंबर, संतोष मंगल कार्यालय, गुजर नगर, वाकड रोड चौक या मार्गे डांगे चौक, असा महा रोड शोचा मार्ग होता.डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ महा रोड शोची सांगता झाली.या महा रोड शोमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर महायुतीचे अनेक वरिष्ठ नेते देखील सहभागी झाले . या महा रोड शोमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page