जेष्ठ समाजसेवक श्री डाॅ बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक

मावळ मराठा न्यूज – (संजय शंके जाणीव संघटना पुणे)महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पुण्यातील पुना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या दहा दिवसांपासून डॉक्टरांच्या सततच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत अधूनमधून चढ-उतार होत असल्याने समर्थक व सामाजिक वर्तुळात मोठी चिंता निर्माण झाली आहे. डॉ बाबा आढाव यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच मी आज शनिवारी दुपारी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन वैद्यकीय पथकाशी चर्चा करून उपचार प्रक्रियेबाबत माहिती घेतली. तसेच कुटुंबीयाची सौ शीला व असिम आणि अंबर यांची भेट घेऊन डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयाशी संबंधित त्रास वाढल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि त्यांच्या टीमकडून उपचार सुरू असून, सध्या प्रकृती स्थिर असली तरी पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले. जनतेला माझी नम्र विनंती आहे की कोणत्याही अफवा न पसरविण्याची विनंती करत आहे. अधिकृत किंवा कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या माहिती वरचं विश्वास ठेवावा, असे आवाहन मी करत आहे.कामगार, कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी आयुष्यभर काम करणारे बाबा आढाव यांचे स्वास्थ्य लवकर सुधारावे, यासाठी प्रार्थना करु या . अनेक सामाजिक कार्यकर्ते, कामगार संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करून लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे. मैने देखा हैआप लढे है,जीते है I आप लढ रहे है, आप जीत जायेंगे Iये मुझे विश्वास है

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page