मावळात मतदान उत्साहात, ७२.१० टक्के विक्रमी मतदान,मावळचा कारभारी कोण ? बापू भेगडे की सुनील शेळके उत्सुकता शिगेला

मावळ मराठा न्युज :- मावळात यावेळी वेगळ्या प्रकारची निवडणूक पाहायला मिळाली,सर्व पक्षीय अपक्ष बापू भेगडे आणि महायुती कडून विद्यमान आमदार सुनील शेळके यात सरळ लढत झाली त्यामुळे मावळात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.मावळ विधानसभा मतदारसंघात सुमारे ७२.१० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून रात्री उशिरा सांगण्यात आले. मतदानाची अंतिम आकडेवारी आज (गुरुवारी) दुपारपर्यंत स्पष्ट होईल, असे अधिकारी यांनी सांगितले. यावेळची मतदानाची टक्केवारी तुलनेने मागील दोन्ही विधानसभा निवडणुकांपेक्षा जास्त आहे. मागील वर्षीपेक्षा ३०,४६९ जादा मतदान झाल्यामुळे या विक्रमी मतदानाचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका याचा बसणार याविषयी राजकीय तर्क वितर्क लावली जात आहेत.एकूण मतदारसंख्या ३,८६,१७२ आणि झालेले एकूण मतदान २,७८,४३२ म्हणजेच एकूण ७२.१०% मतदान झाल्याचे प्रथम दर्शनी दिसते. मागील निवडणुकीपेक्षा ३०,४६९ पेक्षा जास्त मतदारांनी यावेळी मतदान केले आहे. हे मतदान कोणाच्या बाजूने जाणार याविषयी तालुक्यात उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महायुतीचे उमेदवार सुनील शेळके व प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे या दोघांनीही विजयी होण्याचा दावा केला आहे.२३ तारखेला चित्र स्पष्ट होइल जास्तीचे झालेले ३०,४६९ मतदान कोणाच्या पारड्यात जाते हे पाहणे उत्सुतेचे ठरणार आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page