लोणावळ्यात १६ डिसेंबरला विजय दिवस निमित्त विद्यार्थांसाठी वक्तृत्व स्पर्धा करिअर मार्गदर्शन आणि बक्षीस वितरण

मावळ मराठा न्युज – लोणावळा,अखिल भारतीय पुर्व सैनिक सेवा परिषद यांच्यावतीने १६ डिसेंबरला विजय दिवस निमित्त साजरा होणार यात प्रत्येक शाळेची २ तर १० वी व १२ वी च्या मुलामुलींचे भारताच्या विकासात माझे योगदान या विषयावर वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.यासाठी वेळ ३ मिनिटे देण्यात आली आहे.यावेळी १९७१ च्या पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धामधील परमवीरचक्र विजेत्यांची माहिती विदयार्थ्यांना देण्यात येणार आहे.तसेच विदयार्थ्यांसाठी सैन्यदलातीलकरियर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.आणि गुगल फार्म भरलेल्या यशस्वी मुलांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रम आयोजन करण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यामधील देशाभिमान जागृत व्हावा असा आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन हे महिला मंडळ सभागृह लोणावळा येथे करण्यात आले आहे. अशी माहिती या कार्यकमाचे निमंत्रक अखिल भारतीय पुर्व सैनिक सेवा परिषद (महाराष्ट्र व गोवा) मावळ शाखेचे महेश थत्ते आणि सोमनाथ मातेरे यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना दिली. यात सहभागी होण्यासाठी खालील लिंक चा वापर करा *विजय दिवस समारोह* https://presenter.jivrus.com/p/1doGcB_akKe4aNH9hmyyGpXmD8nkz_YyZXT1V2qDDiq4ह्या लिंक द्वारे विजय दिवस प्रतियोगात घेतली जात आहे. ९ ते १२ चे विद्यार्थी भाग घेऊ शकतात आत्ता पर्यंत वेगवेगळ्या शाळेतील २०९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला अणि बर्‍याच मुलांना 100% यश मिळाले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page