कुसगाव ग्रामपंचायतच्या वतीने वैकुंठरथ आणि कचरा व्यवस्थापनसाठी घंटागाडीचे लोकार्पण








मावळ मराठा न्युज -कुसगांव बुद्रुक येथील ग्रामस्थांची सेवेसाठी नुकताच वैकुंठ रथ आणि घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले.कुसगाव बुद्रुक या गावाची वाढती लोकसंख्या आणि पर्यटन नगरी लोणावळा शहराला लागूनच कुसगाव बुद्रुक गांव वसले आहे.त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन कुसगाव ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापन अधिक सुलभ व्हावं या उद्देशाने अजुन घंटा गाडी घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला अजुन कार्यक्षम बनवण्याचा निर्धार केला आहे. कुसगाव बुद्रुक च्या सरपंच अश्विनीताई गुंड आणि त्यांचे सहकारी उपसरपंच आणि सदस्य यांच्या सहकार्य आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आणि मावळ तालुका भाजप अध्यक्ष भाऊसाहेब गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली कुसगाव बुद्रुक चा विकास करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. कुसगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या सोयीसाठी बाळासाहेब गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठ रथाचे देखील लोकार्पण करण्यात आले त्यामुळे गोर गरीब यांच्या निदान मृत्यूसमयी होणारी होरफळ तरी थांबेल यासाठी हा रथ त्याकुटुंबासाठी मोठा दिलासा ठरणार आहे.आताचे जीवन कष्टदायी होत चालले आहे. या वैकुंठ रथामुळे निदान मृत्यु तरी सुखकर होईल.



