कै.डाॅ.मंगला शंकर परांजपे स्मृतिपुष्प निमित्त अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

‘मावळ मराठा न्युज – तळेगाव,नाटक हा एक विचार आहे,नाटक आपल्याला ताकद देतं,फक्त आपल्यात जिद्द पाहिजे.एकट्यानं सादरीकरण न करता सर्वाना बरोबर घेवुन करा.प्रेक्षकांची प्रायोरिटी पहा. इ.नाटकासाठी आवश्यक महत्वाचे एकेक मुद्दे प्रसिध्द लेखिका ,दिग्दर्शिका,अभिनेत्री माननीय अंजली कऱ्हाडकर यांनी मांडले. औचित्य होते कै.डाॅ.मंगला शंकर परांजपे स्मृतिपुष्प निमित्य असलेल्या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेचे. शुक्रवार दि.12 डिसेंबर रोजी कलापिनीत कै.डाॅ मंगला परांजपे यांचा स्मृतिदिन संपन्न झाला. या निमित्याने महिला,पुरुष,विद्यार्थी सर्वांसाठी अभिनयाची कार्यशाळा घेण्यात आली. डाॅ मंगलाताई म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होत्या. त्यांनी आपला वैद्यकिय व्यवसाय सांभाळुन तळेगावातील महिलांसाठी महिलामंडळ,बालवाडी,भजनी मंडळ ,महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे,नाटकं बसवणे इ.उपक्रम करुन , त्या काळात महिला सक्षमीकरणाचं खूप मोठ्ठं कार्य केले. त्यांच्या स्मृतिदिना निमित्त दरवर्षी कलापिनीत विविध उपक्रमांमार्फत त्यांना आदरांजली वाहिली जाते. आतापर्यंत बालवाडी शिक्षिकांसाठी,भजनीमंडळातील महिलांसाठी,सुजाण पालकत्व (बालक पालक), अशा विविध कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. कार्यशाळेच्या सुरवातीला प्रमुख पाहुण्या ,मार्गदर्शक अंजली कऱ्हाडकर,कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुध्दे ,कार्यकारिणी सदस्य लीना परगी ,अशोक बकरे यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. अंजलीतांईनी सुरवातीलाच नाटक हा एक विचार असून तो आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे नाटक हे सांगुन एक एक मुद्दे काही स्वतः सादर करुन तर काही सर्वांना करायला लावुन उलगडत गेल्या.नाटक करताना सर्वप्रथम विचार कसा कराल?स्टेजची पोझिशन, सुरवात,काॅन्फिक्ट, ॲक्शन क्लॅयमॅक्स ,संदेश, नाटकाला निवेदनाची गरज नाही.कमी वेळात नाटक बसवायचं असेल तर च कमिटमेंट(नटाची)असलीच पाहिजे,P(Punctuate)वेळ पाळणे,C कम्युनिकेशन must .हे आवश्यक आहे.स्क्रिप्टचे भाग पाडा. आणि त्याप्रमाणे काम करा. कलाकार कुठे राहातात?त्यांचं डेली रुटीन काय आहे ?त्यांना वेळ कुठली जमेल?यांचा विचार झाला पाहिजे .वेगवेगळे सीन क्रिएट करा,एप्रनचा वापर,कुठुन एण्ट्री घ्यायची,भरपूर कलाकार असतील तर अनेक गोष्टी(बिझनेस)करता येतील,नाटकात सुरवात- मध्य -शेवट एवढंच न करता वेगवेगळे फाॅर्म नाटकात आणले पाहिजेत, हे सगळं अंजलीताईनी फक्त न सांगता सगळ्यांकडुन अभिनयातुन करुन घेतले. गट करुन वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण करायला लावून त्यामध्ये अजून काय आलं पाहिजे सांगितलं.नाटक बसवतांना सर्वात महत्वाचं प्लॅनिंग आणि मला स्टेजवर काय करायचंय याचा वैयक्तिक विचार झालाच पाहिजे हे ही अंजलीताईनी आवर्जुन सांगितले. कार्यशाळेतुन सर्वांनाच खूप छान शिकायला मिळाले. अजलीताईंनी कलापिनीत अनेक वर्षे मुलांची व्यक्तिमत्व विकास शिबिरे घेतली आहेत .त्यामधुनच अनेक मुलं चित्रपट,सिरियल्स,जाहिरातीं मधुन चमकत आहेत. डाॅ परांजपे यांनी आपल्या मनोगतातून सुजाण पालकत्वाचं बाळकडु त्यांच्या आईकडुनच म्हणजे डाॅ.मंगला परांजपे यांच्याकडुन मिळालं हे सांगून ते स्वतःपुरतं मर्यादित न राहाता सर्वांना सामावुन घेणारं हवं हे आवर्जुन सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी लिमये प्रास्तविक कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुध्दे यांनी केले. कै.डाॅ मगलाताईंबद्दलचा परिचय मधुवंती रानडे यांनी सांगितला तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अनघा बुरसे आणि केतकी लिमये यांनी केले. कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page