जिल्हा कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकावली पदके,प्रतिक देशमुख,केतन घारे व सतिश मालपोटे यांची महाराष्ट्रकेसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मावळ मराठा न्युज-लोणावळा,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कुस्तीगीर तालिम संघ-पुणे यांच्या वतीने कोंढवा बुद्रुक येथे नुकतीच पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील सात मल्लांनी पदके पटकावली आहे. यामध्ये साई चांदेकर, धिरज शिंदे यांनी सुवर्णपदक तर ओम पवार, स्वराज बोडके, सतिश मालपोटे, केतन घारे व प्रतिक देशमुख यांनी आपापल्या वजनी रौप्यपदक पटकावले आहे. सतिश मालपोटे, केतन घारे व प्रतिक देशमुख यांची अहिल्यादेवी नगरला होणाऱ्या ६७ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बालगटातील ४८ किलो वजनी गटात आढले येथील साई बाळू चांदेकर तर ५१ किलो वजनी गटात उर्से येथील धिरज मारुती शिंदे यांनी सुवर्णपदक असुन, काले पवनानगर येथील ओम दिपक पवार याने ३२ किलो तसेच गहुंजे येथील स्वराज शेखर बोडके याने ३६ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ गादी विभागात फळणे येथील सतिश रघुनाथ मालपोटे याने ५७ किलो सडवली येथील केतन नथु घारे याने ७९ किलो तर प्रतिक शंकर देशमुख याने मानाच्या महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ किलो) वजनी गटात रौप्यपदक पटकावले असून, सतिश मालपोटे, केतन घारे व प्रतिक देशमुख यांची २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अहिल्यादेवी नगरला होणाऱ्या ६७ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच बालगटातील साई चांदेकर व धिरज शिंदे यांची मे महिन्यात होणाऱ्या पहिल्या बालगट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विजेत्या मल्लांचे मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे आश्रयदाते व अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै.चंद्रकांत सातकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व ऑलंम्पिकवीर कुस्तीगीर पै.मारूती आडकर, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. संभाजी राक्षे, अध्यक्ष पै.खंडू वाळूंज, सचिव व राष्ट्रीय कुस्तीगीर पै.बंडू येवले, उपाध्यक्ष व विद्यापीठ चॅम्पियन पै.सचिन घोटकुले, पै.मनोज येवले, राष्ट्रीय कुस्तीगीर व कार्याध्यक्ष पै.नागेश राक्षे, सहसचिव व महाराष्ट्र चॅम्पियन ॲड. पै.पप्पु कालेकर, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. भरत लिमण, पै .निवृत्ती काकडे, महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी कारके, पै.विष्णु शिरसाट, पै. विश्वास वाघोले, पै. ऋषिनाथ शिंदे, पै.धोंडिबा आडकर, पै. सुरेश आगळमे, पै. नारायण आडकर, पै. किशोर सातकर, पै.बाळासाहेब काकरे, पै.चंद्रकांत शिंदे, पै.बाळू वाळूंज, पै.अंकुश काकरे, पै. नवनाथ बोडके, पै. दिपक दाभाडे, संघाचे सल्लागार पै. राजु बच्चे, पै.देविदास कडू यांनी अभिनंदन केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page