हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त हिंदूहृदयसम्राट चषक-२०२३भव्य टेनीस क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न

मावळ मराठा न्यूज,लोणावळा ,हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त दिनांक २८जानेवारी २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत शिवसेना लोणावळा शहर समन्वयक जयवंत भाऊ दळवी, युवासेना चिटणीस पुणे जिल्हा शाम सुतार, शिवसेना सल्लागार लोणावळा शहर रामभाऊ थरकुडे तसेच समर्थ स्पोर्ट्स चे प्रो.प्रा.शिक्षक सोमनाथ ठोंबरे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली पार पडला.या स्पर्धेचा विजय संघ म्हणजेच हिंदूहृदयसम्राट चषक २०२३ चा मानकरी संदिप परंडवाल व गणेश विधाटे देहुरोड येथील ११ चॅंलेंजर हा संघ ठरलासाखळी सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी,गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षन यांच्या जोरावर ह्या संघाने फायनल मध्ये धडक मारत हा किताब आपल्या नावे केला.तसेच स्पर्धेत एकूण पाच क्रमांक ठेवण्यात आले होते ते पुढीलप्रमाणेप्रथम – संदिप परंडवाल व गणेश विधाटे ११ चॅंलेंजर संघ (देहुरोड)द्वितीय – श्रीराम गवळीवाडा संघ (लोणावळा)तृतीय – कोटेश्वरवाडी D-11 संघ (तळेगाव)चतुर्थ – स्वराज्य संघ (उर्से, मावळ)पाचवा – तळेगाव ट्रॅकर्स (तळेगाव)उत्कृष्ट सामनावीर(Player of the match) डी-११ संघ तळेगाव चा कर्णधार तसेच मावळ क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष मनोज दाभाडे हे ठरले त्यांना यासाठी उत्कृष्ट सायकल देऊन सन्मानित करण्यात आले.खरंतर या स्पर्धेसाठी खुपचं संघ नाव नोंदणी साठी इच्छुक होते परंतु हि स्पर्धा नीयोनबद्ध तसेच मावळ टेनीस क्रिकेट असोसिएशनच्या अधीकृत रजीस्टर खेळाडू व संघ यांना वाव मीळावा या साठी हि स्पर्धा मावळ असोसिएशन चार हाफ(poll) तसेच लोणावळ्यातील स्थानिक संघासाठी एक ओपन हाफ (Poll) यामध्ये पाच दिवस खेळवण्यात आली आणि पाच दिवस पाच संघ बक्षीस पात्र फेरीसाठी काढण्यात आले आणि यामध्ये सेमी फायनल आणि फायनल सामने खेळविण्यात आले.यावेळी पारीतोषीक वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.गौतमजी चाबुकस्वार उपस्थित होते तसचे शिवसेना तालुकाप्रमुख आशीष ठोंबरे, शहरप्रमुख लोणावळा शहर बाळासाहेब फाटक,मा.नगरसेवक नीखीलजी कविश्वर,मा.नगरसेवक शिवदास पिल्ले, युवासेना तालुका अधीकारी विजय तीकोणे व्हि.पि.एस महाविद्यालयाचे प्राचार्य दरेकर सर, शहर संघटक सुभाष डेहनकर, उपशहरप्रमुख संजय भोईर,प्रकाश पाठारे,मनेष पवार,विभाग संघटक परेश बेडेकर,उद्योजक धनंजय साळुंखे तालुका संघटक आनील ओव्हाळ,युवासेना उपशहर अधीकारी विवेक भांगरे, शिवसेना वाहतुक सेनेचे माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण दाभाडे,युवासेनेचे आमीत कदम,विभाग प्रमुख कमर अन्सारी उपविभागप्रमुख संजय शिंदे, शिवसैनिक उत्तम ठाकर,आनील वाघमारे,गोपी चव्हाण,पराग आण्णा औरंगेया स्पर्धेतील समालोचनासाठी अक्षय चव्हाण व कल्पेश ठोंबरे यांनी मोलाचे सहकार्य केलेतसेच या स्पर्धेसाठी पंच म्हणून कर्जत चे चौधरी सर व देहुरोड चे फ्रांसीस सर यांची नेमणूक करण्यात आली होती.स्कोअर बुक चे काम सुजल सुतार व विनोद पेशकर यांनी चोख व अचुकपणे पार पाडली.तसेच संपूर्ण पाच दिवस या कार्यक्रमासाठी ११ हनुमान संघ ठोंबरेवाडी मधील सुनील साठे,पंकज देशमुख,सचिन लाल,यश राऊत,ओमकार सुतार,चिंतन सुतार,जय मेने,श्रेयश दाभाडे,गणेश कांबळे यांनी वेळ दिल्याबद्दल आयोजकांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आलेयावेळी या स्पर्धेसाठी ज्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या सहकार्य केले आशा सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page