अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद महाराष्ट्र गोवा मावळच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आणि मान्यवरांचा सन्मान

मावळ मराठा न्युज – लोणावळा,अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद महाराष्ट्र गोवा (मावळ) च्या माजी सैनिकांनी आज १६ डिसेंबर २०२५ विजय दिवस हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात लोणावळ्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .ह्याच वेळी मुलांच्या बालमनावर संस्कार करणाऱ्या सौ स्वरूपा देशपांडे,सौ ऋतुजा मेहता सौ सुचेता खलतकर,सौ फडके ह्याचा सत्कार करण्यात आला. १९७१ च्या युद्धात भाग घेतलेले डी.के हस्ति ,मल्लखांब प्रशिक्षक विकास गायकवाड, पर्यावरण अभ्यासक शिवाजी गाडे, मुलांना सूर्यनमस्कार व इतर संस्कार करणारे विश्वनाथ पूटोल तसेच अनुकरणीय व्यक्तिमत्त्व श्रीमती शीला जोशी ह्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण आणि वक्ते कर्नल नरेश गोयल ह्यानी १९७१ चे युद्ध अणि परमवीर चक्र विजेत्यांची जोशपूर्ण माहिती सांगितली. “भारतीय सेनेत असणार्‍या नोकरीतील संधी” ह्यावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश थत्ते ह्यानी केले.सदर कार्यक्रम आयोजित करण्यात माजी सैनिक सोमनाथ मात्रे, बि.व्ही कडू ,महेश्वर भिंगे, बाळ पवार, प्रकाश गाडे, श्री ढाकरे ,श्री जमवाल, श्रीमती हेमलता शर्मा, श्रीमती आरती वैष्णवी, श्रीमती नमिता पासि ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. वक्तृत्व स्पर्धेचे गुण परीक्षण श्री पंकज जयस्वाल अणि श्री विपीन मोघे ह्यानी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page