विजयकुमार जोरी लिखित”तस्मैश्री तांबे बाई”या भावस्पर्शी चरित्र कादंबरीचे प्रकाशन अमोल कोल्हे,प्रा. नितीनजी बानगुडे पाटील यांचे हस्ते संपन्न


मावळ मराठा न्युज :-नारायणगाव (२८ मार्च २४) : येथील माजी लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान उपसरपंच कार्यसम्राट बाबू पाटे संस्थापित राजे शिवराय प्रतिष्ठान आयोजित जिल्ह्यातील भव्य शिवजयंती सोहळ्यात नारायणगाव नगरीचे सुपुत्र शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी असलेले लोणावळा ता. मावळ येथील सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार जोरी लिखित एका आदर्श शिक्षिकेचा जीवनपट आणि जीवनसंघर्ष उलगडणाऱ्या “तस्मैश्री… तांबे बाई” या भावस्पर्शी चरित्र कादंबरीचे कार्यक्रमातील मुख्य आकर्षण गावचं भूषण खासदार अमोल कोल्हे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख शिवव्याख्याते प्रा. नितीनजी बानगुडे पाटील यांचे शुभसहस्ते संपन्न झाले.याप्रसंगी मा. खासदार आढळराव पाटील, मंगलदास बांदल, सत्यशील शेरकर, आशाताई बुचके, अनिलतात्या मेहेर, पद्मश्री डॉ. मनोहर डोळे, प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तिपरायण डॉ. पंकज महाराज गावडे, विरोबा पतसंस्था अध्यक्ष बाळासाहेब पाटे, सरपंच शुभदा वाव्हळ आदि मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमात गावातील गुणवत्तावान ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या मनोगतानंतर अखेरिला शिवव्याख्याते नितीन बानगुडे यांचे तडफदार व्याख्यानाने कार्यक्रम संपन्न झाला. संस्थापक बाबू पाटे यांनी आपल्या आश्वासक मनोगतातून कार्यआढावा घेत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व उपस्थित जनसागराची कृतज्ञता व्यक्त करीत सर्वांना धन्यवाद दिले.संतोष नाना खैरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर औटी, मेहबुब काझी सर व हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले.



