दिनांक १८ एप्रिल पासून नामनिर्देशन पत्रे भरायला होणार सुरुवात,लोकसभा निवडणूक प्राचाराला येणार वेग


मावळ मराठा न्युज :- मावळ,मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात होत असून दि.१८ एप्रिल रोजी निवडणूकीची सुचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिनांक दि.२५ एप्रिल असेल. तर दि.२६ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छानणी केली जाईल. दि.२९ एप्रिल हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिनांक असेल. दि.१३ मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर दि.४ जून रोजी मतमोजणी प्रक्रीया पार पडणार आहे. मावळ मतदार संघच्या प्रचाराला जरी सुरुवात झाली असली तरी फॉर्म भरल्यानंतरच लोकसभा निवडणूक प्रचार,शक्ती प्रदर्शन कोपरा सभा,रॅली,जाहीर सभा होणार आहेत. सध्या भेटी गाठी,आढावा बैठका,निवडणूक प्रचाराची रणनीती साठी कार्यकर्ता मेळावा,ह्या महिन्यात खूप सर्वच सणं आल्याने कार्यक्रम इच्छुक उमेदवार मतदारांना भेटत आहेत.




