लोणावळ्यात दोन प्रभागातील मतदान २० तारखेला तर मतमोजणीला २१ तारखेला सकाळी १० वाजता होणार सुरुवात

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता मतमोजणी दिनांक २१/१२/२०२५ रोजी लोणावळा नगरपरिषद तळमजला येथे सकाळी १० वा. पासून सुरु होणार आहे. मतमोजणी करीता प्रभागनिहाय १३ टेबल लावण्यात येणार आहेत. नगराध्यक्ष पदाकरीता सहा फे-या होणार होणार आहेत. तसेच नगरसेवक पदा करीता प्रभागाचे मतदान केंद्र निहाय फे-या होणार आहेत. प्र.क्र.१ ,२ ,१२ करीता चार फे-या, प्र.क्र.३ ,४ ,६ ,७ ,११ करीता पाच फे-या, प्र.क्र.८ ,९ ,१३ करीता सहा फे-या होणार आहे. तसेच दि.२ .१२ .२०२५ रोजी प्र.क्र.५ अ,१० ब करीता झालेल्या मतदानाकरीता चार फे-या होणार आहेत. त्यानंतर दि.२० .१२ .२०२५ रोजी प्र.क्र.५ ब, १० अ करीता होणा-या मतदानाकरीता त्याच टेबलवर चार फे-या होणार आहेत .









