क्वीन्स टाऊन सोसायटीतर्फे कॉर्फबॉल स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सन्मान

मावळ मराठा न्युज :-पिंपरी (प्रतिनिधी) आग्रा येथे संपन्न झालेल्या १९ व्या राष्ट्रीय सब ज्युनियर कॉर्फबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवल्याबद्दल चिंचवड येथील क्वीन्स टाऊन सोसायटीच्या वतीने संघातील सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.यशस्वी संघातील रिया बोरा ( कर्णधार), युविका कोल्हे, अन्विता बोरसे, स्निग्धा सातव, प्राची संघवी, मुले- कृष्णा सातव, आर्यण शिंगटे, प्रद्युम्न नायर,आरिझ दानवडे या खेळाडूंचा सत्कारामध्ये समावेश आहे. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुजित पाटील, सचिव बबन भोसले, सुरेश गारगोटे,ज्येष्ठ दंतवैद्य डॉ.माऊली फरांदे, माजी नगरसेविका भारती फरांदे,ॲड कुंडलिक गावडे, ॲड सोपान माने, उद्योजक भास्कर गावडे, प्रदीप दिवटे, बाबासाहेब माने, मल्लिनाथ कलशेट्टी, कार्यक्रमाचे समन्वयक रमेश सातव,प्रशिक्षक सचिन ववले,अविनाश अहिरशिंगे आणि सोसायटीतील सर्व संचालक मंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी क्रीडा मानसिकता विषयक (लंडन) पदवीप्राप्त अदिती गारगोटे म्हणाली कि,खेळाडूंनी खेळताना आपलं डोकं शांत ठेवून खेळाकडे अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे.सदरील खेळाडू शिकत असलेल्या सेंट ऊर्सूला हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर ग्रेसी यांनी अभिनंदन केले. यावेळी डॉ फरांदे यांनी शुभेच्छा दिल्या. सोसायटीचे सुजित पाटील यांनी त्यांच्या मनोगतांमध्ये सोसायटीची क्लब हाऊस आणि सोसायटीमधील मुलांना खेळाच्या बाबतीमध्ये जे जे काही सहकार्य सोसायटीच्या वतीने शक्य ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सोसायटीतून दरवर्षी असे नवनवीन खेळाडू घडावेत. अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गारगोटे यांनी केले. आभार प्रदर्शन उद्योजक रमेश सातव यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page