शंकरा आय हॉस्पिटल,पनवेल,संजीवनी मेडिकल फाउंडेशन व लायन्स क्लब लोणावळा सुप्रीमो यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सम्पन्न



मावळ मराठा न्यूज़:- लोणावला, शंकरा आय हॉस्पिटल,नवीन पनवेल,संजीवनी मेडिकल फाउंडेशन व लायन्स क्लब लोणावळा सुप्रीमो यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संजीवनी हॉस्पिटल लोणावळा येथे आयोजित करण्यात आले. १३० नेत्रारुग्नानी या शिबीराचा लाभ घेतला. तसेच १० नेत्रारुग्नांस शस्त्रक्रियेला शंकरा हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले. सदर मोफत शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभल्याने सूप्रीमो सेवा कार्य कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे. शंकरा आय हॉस्पिटलचे श्री प्रकाश पाटील व सहकारी तसेच डॉ अमोल अगरवाल संजीवनी हॉस्पिटल , लायन्स क्लब लोणावळा सूप्रीमो अध्यक्ष ला. जयराम गौडा यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सूप्रीमो सदस्य ला अमीन वाडीवाला, ला सुरैया वाडीवाला, ला. सुधिर कदम, ला. नमिता कदम, ला. विद्या गौडा, ला विश्वनाथ पुट्टोल, ला रंजना पूत्तोल,ला सचिन कुटे, ला अर्पिता कुटे, ला धिरेंद्र चौकिकर, ला. आकांशा चौकिकर, ला. गिरिश पारख, ला. राकेश जैन, ला सागर तावरे, ला विजय मानकर ला प्रज्वल मातेरे, ला सिद्धांत कदम आदी सदस्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजन करण्यात सक्रिय सहभाग नोंदवला. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा, ज्येष्ठ नागरीक संघ तसेच विविध संस्थांच्या सदस्यांनी शिबिरास भेट दिली. सूप्रीमो तर्फे श्री प्रकाश पाटील व डॉ अमोल अगरवाल यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.




