दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या वतीने लेखन साहित्य व स्टेशनरीचे वाटप

मावळ मराठा न्यूज :- मावळ,मावळ तालुक्यातील दुर्गम अशा येलघोल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येलगोल या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. मनशक्ती रेस्ट न्यू वे केंद्र लोणावळा या केंद्रातर्फे श्री नंदकिशोर खंडेलवाल श्री डॉक्टर सुहास गोसावी श्री ओम प्रकाश खंडेलवाल श्री उमेश भुतडा यांनी सामाजिक दायित्वातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात त हातभार लावण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व स्टेशनरी वाटप करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.डॉक्टर सुहास गोसावी यांनी विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवून स्वतःचा व समाजाचा उद्धार करावा, असा सल्ला दिला. तसेच श्री नंदकिशोर खंडेलवाल यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रतेचे फायदे सांगून शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अर्जुन दत्ताराम घारे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये गावामध्ये शैक्षणिक वातावरण तयार करून लोकसहभाग वाढवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच श्री सुखदेव घारे, उपसरपंच लक्ष्मण भिलारे, माजी सरपंच श्री जयवंत घारे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री राजेंद्र घारे, विजय घारे शाळा स्थापन समिती उपाध्यक्षा सौ वैशाली नारायण घारे सदस्या वैशाली सुनील घारे श्री ज्ञानेश्वर भागू घारे असे सन्माननीय उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भागवत झांबरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सुरेश तांदळे यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page