लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न








मावळ मराठा न्युज -लोणावळा,येथील लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या अध्यक्षा विजया कल्याण व शाळा समिती माजी सभापती तथा नगरसेवक देवीदास कडू यांच्या हस्ते पार पडले.तर रांगोळी व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक श्री.दत्ता येवले व यांच्या शुभहस्ते पार पडले. बक्षीस वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष श्री.राजेंद्र सोनवणे यांच्या शुभहस्ते झाले. या वेळी नवनिर्वाचित नगरसेवक श्री.सुभाष डेनकर, नगरसेविका सौ.रेश्मा पाठारे, नगरसेविका सौ.आरती तिकोणे, नगरसेविका सौ.लक्ष्मी पाळेकर,नगरसेविका सौ.श्वेता गायकवाड, नगरसेविकासौ.स्वप्ना कदम,नगरसेवक श्री.सनी घोणे, लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री.रवी पोटफोडे, माजी उपनगराध्यक्ष श्री.नारायण पाळेकर, माजी उपनगराध्यक्ष श्री.मारुती तिकोणे, माजी उपनगराध्यक्ष श्री.धीरूभाई टेलर,सामाजिक कार्यकर्ते श्री.अर्जुन पाठारे रोटरी क्लब ऑफ लोणावळाचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या वार्षिक स्नेहसंमेलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यंदाच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना स्वच्छ भारत अभियान, स्त्रीमुक्ती व राष्ट्रभक्ती यावर आधारित होती.विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, गायन,व अभिनयाच्या माध्यमातून विविध सामाजिक विचार प्रभावीपणे मांडले. शाळेच्या माजी विद्यार्थिनी व गायिका सौ.वर्षा देसाई फाले यांनी मंत्रमुग्ध करणारे गायन सादर केले.प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण बलकवडे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. रामचंद्र सूर्यवंशी व पालक सदस्य श्री.गणेश देसाई यांनी यांनी केले. तर आभारप्रदर्शन श्री.अमजद पठाण सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रद्धा मंगवडे, साक्षी नलवडे व काजळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.



