ज्येष्ठ नागरिक संघ,लोणावळा यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज-लोणावळा,ज्येष्ठ नागरिक संघ,लोणावळा विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार कार्यक्रम प्रमुख पाहुणे प्राचार्य नरेंद्र देशमुख वलवन कॉलेज डॉ.संदेश कदम भुशी बालग्राम बी ए शिंगाडे, सिंहगड कॉलेज असिस्टंट प्राचार्य ,नासिर भाई शेख,राष्ट्रवादी शरद पवार गट लोणावळा शहराध्यक्ष,सौ रेखाताई जोशी माजी नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व गणेश वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.गणेश वंदना श्रीमती मंगला राणे व सामुदायिक संघाची साने गुरुजीची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सादर करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत करून व त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे यांनी व प्रमुख पाहुण्यांचा जेष्ठ नागरिक यांचे हस्ते विद्यार्थ्यांचे व ज्येष्ठांच्या नातवांचे सत्कार करण्यात आले. डॉक्टर संदेश कदम यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून बरोबर उत्तर देणाऱ्यांना अष्टपैलू साने गुरुजी प्रतिमा व एक सन्मानपत्र बक्षीस देण्यात आले. विद्यार्थ्यांना सत्कारामध्ये एक शाक बँग व एक पुस्तक देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाच्या सेक्रेटरी रश्मी शिरसकर यांनी केले तसेच कार्यक्रमासाठी सर्व कमिटी मृदुला पाटील, संध्या गव्हले, शारदा अग्रवाल, कांचन लुणावत,ज्योती रांगणे,उपाध्यक्ष आत्माराम लोखंडे,रवी कुलकर्णी व सुनील पानगावकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.संघाचे खजिनदार गोरख चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले व त्यानंतर आमचे जेष्ठ सभासद अरविंद भाई मेहता यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व नंतर सामुदायिक पसायदान घेऊन कार्यक्रम सांगता करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page