मावळातील अद्ययावत क्रीडा संकुलासाठी आमदार सुनील शेळके यांचे क्रीड़ा मंत्र्यांना साकडे

मावळ मराठा न्यूज़ ,मावळ : मावळ तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुल व्हावे, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून आमदार सुनील शेळके सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत. बुधवारी मुंबईत मंत्रालय येथे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन क्रीडा संकुल उभारण्याच्या कामासंदर्भात संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे, याबाबतचे निवेदन आमदार शेळके यांनी दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘तालुका तिथे क्रीडा संकुल’ हे धोरण राबविले होते. परंतु, मावळ तालुक्यात संकुल उभारण्याबाबत कुठलीही पावले उचलण्यात आली नव्हती, परंतु, सुनील शेळके आमदार झाल्यावर सातत्याने पाठपुरवठा केला आहे. मावळ तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्यासंदर्भात क्रीडा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन व्हावे, अशी विनंतीनंतर लवकरच पाठपुरावा बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page