पथविक्रेता समिती सदस्य संदीप लक्ष्मण पोटफोडे यांचे लोणावळा नगरपरिषदेच्या पथविक्रेता समितीच्या मागण्यांसाठी २ ऑक्टोबर ला आमरण उपोषणाचा इशारा






मावळ मराठा न्युज – लोणावळा,टपरी व पथ विक्रेता समितीने एक आठवड्यापूर्वी लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांना टपरी धारकांच्या विविध मागण्या करिता व पथविक्रेता समितीची बैठक घेऊन फेरीवाला धोरण लोणावळा शहरात राबवण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार,मेल करून विनंती केली परंतु आपण याकडे दुर्लक्ष करून केराची टोपली दाखवली आहे. आमच्या मागण्या १. विद्यमान सर्व पधविक्रेत्यांचे पुनः सर्वेक्षण पथविक्रेता समिती मार्फत करावे.२. नोंदणीकृत पथ विक्रेत्यास ओळख पत्र, नोंदणी प्रमाणपत्र व पथविक्री प्रमाणपत्र देण्यात यावेत.३. राष्ट्रीयकृत बैंक मार्फत नोंदणीकृत विक्रेत्याकडून विक्री शुल्क व दंड वसुल करून अधिकृत पावती देण्यात यावी,४. विक्री प्रक्षेत्र व ना विक्री प्रक्षेत्र निश्चित करून पथविक्रेता आराखडा तयार करावा,५. पायाभूत सुविधा (लाईट, पाणी, शौचालय, कचरा विल्हेवाट व इतर) पुरवावे.६. सार्वजनिक हिताचे विकास प्रकल्प, सुरक्षाविषयक प्रश्न, वाहतूक कोंडी अशी वैध कारणे असतीलतरच पथविक्रेतांना स्थलांतर करावे, तो पर्यंत अतिक्रमण कारवाई करू नये.७. पथविक्रेत्यांचे हक्क व जबाबदाऱ्या संबंधित धोरण, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात यावे,८. कायदे व कल्याणकारी योजना राबवण्यात याव्यात अशी मागणी संदीप पोटफोडे यांनी केल्या आहेत.आमच्या वरील मागण्यांचे गांभीर्य नाही असे समितीच्या निदर्शनास आले आहे.टपरी व पथ विक्रेता समिती सदस्य संदीप पोटफोडे यांनी मुख्याधिकारी अशोक साबळे यांना दिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे कि त्यांनी नुकतेच नियम बाह्य पत्र काढून उपमुख्याधिकारी यांची आपणांस वेळ नाही म्हणून फक्त कामकाज चालावे व आपणावर कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून सर्व अधिकार स्वतः कडे ठेऊन नामधारी म्हणून त्यांच्या नेमणूक केली. यावरून असे दिसते की आपणांस टपरी धारकांना देण्यासाठी ३६५ दिवसापैकी एकही दिवस नाही. त्यामुळे आपण समितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा व अधिकृतपणे उपमुख्याधिकारी यांच्या नेमणूकीची शिफारस नगरविकास विभाग आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांना करावी, टपरी धारकांच्या मागण्या गांभीर्याने घेण्यासाठी व प्रशासनाने फेरीवाला धोरण लोणावळा शहरात राबवून योग्य ती लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी लोणावळा नगरपरिषद पथविक्रेता समिती चे सदस्य संदीप लक्ष्मण पोटफोडे यांनी दि. २-१०-२०२६ रोजी सकाळी ११.०० पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणावळा येथे जो पर्यंत समितीच्या मागण्या पूर्ण आणि मान्य होत नाही तो पर्यंत लोकशाही मार्गाने आमरण उपोषण बसणार आहे.होणाऱ्या परिणाम यांना लोणावळा नगरपरिषद जबाबदार असेल असेही लोणावळा नगरपरिषद पथविक्रेता समितीसदस्य संदीप लक्ष्मण पोटफोडे यांनी लोणावळा नगरपरिषदेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.



