महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय महासंघ जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्षपदी प्रा.धनराज पाटील यांची निवड



मावळ मराठा न्युज :-लोणावळा,महाविद्यालयाच्या प्रा.धनराज पाटील यांची मराठी विषयाच्या जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्षपदी निवड .महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ राज्यस्तरीय कार्यकारणी समितीच्या अध्यक्षांच्या सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुनील डिसले, सचिव बाळासाहेब माने ,कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली .यावेळी पुणे जिल्हा व शहर महाविद्यालय मराठी विषय महासंघाची ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष अरविंद मोडक यांनी धनराज पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा.रमेशचंद्रजी नय्यर ,उपाध्यक्ष श्री दत्तात्रय पाळेकर ,सचिव एडवोकेट नीलिमा खिरे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र देशमुख पाटीलयांचे यांनी अभिनंदन केले.




