मावळातील दीपा आणि फ्लेवर्स ऑर्केस्ट्रा बारवर आयपीएस सत्यसाई यांची धडक कारवाई,दोन्ही बार रेस्टॉरंट मालकांवर गुन्हे दाखल

मावळ मराठा न्युज :- मावळ,लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट ई.यांचेकरिता मा.अपर जिल्हा दंडाधिकारी,पुणे यांनी दिनांक ०६/०३/२४ रोजी सीआरपीसी कलम १४४ अन्वये प्रतिबंध आदेश जारी केले होते. तसेच श्री सत्यासाई कार्तिक यांनी सर्व आस्थापना चालकांना सदर आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती श्री कार्तिक यांना प्राप्त झाली होती. त्याची खातरजमा करण्याकामी श्री सत्यसाई कार्तिक यांनी आज दिनांक ०८/०३/२०२४ रोजी त्यांचे पथकाला नमूद माहिती मिळालेल्या ठिकाणी पाठवले असता १)दीपा बार अँड रेस्टॉरंट, कामशेत , तालुका मावळ जिल्हा पुणे, व २) फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट, वडगाव, तालुका मावळ जिल्हा पुणे अशा दोन्ही ठिकाणी पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील दोन्ही ठिकाणी बार रेस्टॉरंट त्यांचे ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई. विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी विक्री करताना दिसून आले, तसेच सदर बारमध्ये ऑर्केस्ट्रा- संगीत विहित कालमर्यादेपेक्षा पेक्षा अधिक वेळेसाठी सुरू असल्याचे मिळून आल्याने नमूद दोन्ही बारमालकांवर भा.द.वि. कलम १८८ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (डब्ल्यू) अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे अनुक्रमे कामशेत पोलीस स्टेशन व वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आले असून पुढील तपास कामशेत व वडगाव मावळ पोलीस करत आहेत. तसेच अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढेदेखील सुरच राहणार असून आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन श्री सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ राहीस मुलानी यांचे पथकाने केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page