मावळचा प्रतिक देशमुख ठरला ग्रिकोरोमन युवा महाराष्ट्र केसरीचा मानकरी,तर वैष्णव आडकरने पटकावले कांस्यपदक







मावळ मराठा न्युज -लोणावळा,मावळ तालुक्यातील सडवली गावचा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता युवा मल्ल प्रतिक शंकर देशमुख याने नुकत्याच नारायणगाव, जुन्नर येथे संपन्न झालेल्या २० वर्षाखालील राज्य अजिंक्यपद ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेत १३० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावट ग्रिकोरोमन युवा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला तर शिवली गावचा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता वैष्णव नारायण आडकर याने या स्पर्धेत ७७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावत राज्य कुस्ती स्पर्धेत मावळच्या दैदिप्यमान कुस्तीचा नावलौकिक वाढवला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने नारायणगाव, जुन्नर येथे नुकतीच २० वर्षाखालील राज्य अजिंक्यपद ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील प्रतिक देशमुख याने १३० किलो आणि वैष्णव आडकर याने ७७ किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. प्रतिक देशमुख याने सोलापूरच्या रामेश्वर येलगू व रायगडच्या वेदांत म्हात्रे यांच्यावर चितपटीने विजयी मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. प्रतिकने सेमीफायनल मध्ये पुण्याच्या आदेश डुबे याचा ८-० अशा गुणाधिक्याने पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत प्रतिकने सांगलीच्या विश्वजीत पाटीलचा ८-० अशा एकतर्फी गुणाधिक्याने पराभूत करून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले व ग्रिकोरोमन युवा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. तसेच वैष्णव आडकरने ७७ किलो वजनी गटात आप आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करत कांस्यपदक पटकावले. प्रतिक आणि वैष्णव हा पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुल येथे वस्ताद विजय बराटे, संदीप पटारे व किशोर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे.प्रतिक आणि वैष्णवच्या यशाबद्दल ऑलंम्पिकवीर कुस्तीगीर पै.मारूती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव पै. मारुती बहिरु आडकर, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज, कुस्तीगीर संघाचे सचिव व राष्ट्रीय कुस्तीगीर पै.बंडू येवले, सहसचिव व महाराष्ट्र चॅम्पियन पै.पप्पु कालेकर, उपाध्यक्ष व विद्यापीठ चॅम्पियन पै.सचिन घोटकुले, पै.मनोज येवले, महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी कारके, पै.विष्णु शिरसाट, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. निवृत्ती काकडे, पै. भरत लिम्हण, कार्याध्यक्ष महाराष्ट्र चॅम्पियन पै. नागेश राक्षे, पै. धोंडीबा आडकर, पै. बाळासाहेब वाळूंज, पै. चंद्रकांत शिंदे, पै. नारायण आडकर, पै. अंकुश काकरे, पै. नथु घारे, पै. दिपक दाभाडे, पै. शिवाजी येवले, पै.सुरेश आगळमे, पै. संदीप काळे, पै. नवनाथ बोडके यांनी अभिनंदन केले आहे.



