ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा चा ३१ वा वर्धापन दिन दिमाखात साजरा

मावळ मराठा न्युज -लोणावळा- ९ एप्रिल २०२५ बुधवार रोजी हॉटेल चंद्रलोक येथे लोणावळा येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा 31 वावर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला.. डॉ मिलिंद भोई,कर्नल भार्गव, ज्येष्ठ समाजसेवक श्री नंदकुमार वाळुंज, आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश पाठारे शिवसेना,लोणावळा शहर अध्यक्ष संजय भोईर आदि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन झाले. संघाची व साने गुरुजींची प्रार्थना, गणेश वंदना, श्रीमती भोळे यांच्या नृत्यालयातील कुमारी बिल्वा हिने गणेश वंदना नृत्य सादर करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. सन- २०२४ -२०२५ यां काळात ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून विरंगुळा केंद्रांत आणि हॉटेल चंद्रलोक येथे सातत्याने ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यां साठी विविध कार्यक्रम राबवले जातात. एकतिसाव्या वर्धापन दिनानिमीत्त प्रमुख पाहुणे भोई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई, यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य, मन याची काळजी कशी घ्यावी यां विषयी आपल्या ओघवत्या शैलीतून मार्गदर्शन केले. यां कार्यक्रमासाठी कर्नल भार्गव, खडकी, पी आर सी,श्री नंदकुमार वाळुंज, उद्योजक, श्री प्रकाश पाठारे, संस्थापक, अध्यक्ष, आधार फाउंडेशन, डॉ. नामदेवराव डफळ, कोषाध्यक्ष, पुणे प्रा. वि फ़ेसकॉम, श्री अनिल गायकवाड , माजी रिजन अध्यक्ष, श्री देविदास कडू,माजी नगरसेवक,गट नेता भाजपा, श्री संजय भोईर,शिवसेना लोणावळा शहर अध्यक्ष, सौं ब्रिन्दा गनत्रा, माजी नगर सेविका, पत्रकार श्री कुमठेकर, पत्रकार श्री प्रदिप वाडेकर,मावळ वार्ता, संपादक, एमएन न्यूज,श्री संजय पाटील, श्री अनिष गनत्रा, हॉटेल चंद्रलोक चे मालक आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांना शाल, एक रोप, बुके देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष , सेक्रेटरी,सल्लागार, पदाधिकारी, समाजातील दानशूर ,लायंस क्लब, रोटरी क्लब अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यां प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य बहुसंखेने हजर होते, त्यांना फेटा बांधून, गुलाब पुष्प, पेढा देऊन त्यांचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पांडुरंग तिखें आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. रश्मि शिरसकर यांनी सूत्र संचालन केले तर श्रीमती मृदुला पाटील यांनी आभार व्यक्त केले. पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page