श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त ” वै.सोपानराव म्हाळसकर यांना आदरांजली म्हणून रक्तदान शिबिरात १६४ जणांनी केले रक्तदान

मावळ मराठा न्युज:- वडगांव तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त , वडगांव चे मा.सरपंच ” वै.सोपानराव बाबुराव म्हाळसकर उर्फ आण्णा “वय वर्षे ८२ यांचे रविवार दिनांक २१/४/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै.आण्णांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली आणि एक समाजोपयोगी उपक्रम म्हणून आज रविवार दि. २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थान चे मुख्य विश्वस्त , वडगांव चे मा.सरपंच ” वै.सोपानराव बाबुराव म्हाळसकर (आण्णा ) यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली आणि एक समाजोपयोगी उपक्रम म्हणून आज रविवार दि. २८ एप्रिल २०२४ रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात म्हाळसकर परिवारातील ८२ आणि इतर नातेवाईक आणि मित्र परिवार यांचे देखील ८२ असे ” एकूण १६४ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. सर्वांनी जास्तीत जास्ती संख्येने या सेवाकार्यात सहभागी झाल्याबद्दल मनापासून आभार मानन्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page