मावळ कन्या ऍड रंजना भोसले व इतर मान्यवर यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत घवघवीत यशाबद्दल कौतुक सोहळा उत्साहात संपन्न









मावळ मराठा न्युज -(ऍड मोनाली कुळकर्णी )वडगांव – न्यायलयीन परिसरात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या निवडणुकीत निवडून आलेल्या ११ मान्यवारचा गौरव करण्यात आला. त्या प्रसंगी आपल्या न्यायालयातील न्यायाधीश मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय अनभुले साहेब व आदरणीय मे. हुद्दार साहेब तसेच मे प्रथम वर्ग न्याय दांडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश क. स्तर, मे. विभुते साहेब, मे. जाधव साहेब, मे. डोईफोडे साहेब तसेच सर्व विधिज्ञ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करत असताना मान्यवर ऍड. विठ्ठराव कोंडे देशमुख साहेब यांनी रंजना भोसले मॅडम यांचा उल्लेख “सुवर्ण कन्या” म्हणून केला, ऍड. जायभावे सरांनी “आमची भगिनी तालुक्यातून नव्हे तर राज्यातून निवडून आली आहे,आणि तो ही पहिला नं”ने. मे. अनभुले साहेबांनी देखील सर्वांचे कौतुक केले तसेच तुमच्या प्राप्त केलेल्या यशाचे कौतुक केले. ऍड. पठाण सरांनी त्यांच्या सुंदर शायरी च्या माध्यमातून भोसले मॅडम यांचे कौतुक केले. ऍड. राजेंद्र उमाप यांनी देखील आपल्या परिश्रमातून मिळवलेल्या यशाचे कौतुक केले. भोसलेमॅडम यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास ऍड. निलेश अग्रवाल सांगत असताना भोसले मॅडम यांना अश्रू अनावर झाले. भोसले मॅडम यांचा गौरव होत असताना सर्वांनी उभे राहून त्यांचा गौरव केला. सर्वांच्या मनात एकच भावना होती भोसले मॅडम यांनी इतिहास घडवला आणि मावळाचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आयोजकांनी अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. आणि हे सर्व होतं असताना त्या सुवर्ण क्षणांचे सर्व साक्षीदार झालो. तुमच्या अविरत कारकिर्दीस सर्व वकील बंधू भगिनी यांचे कडून हीच मानवंदना खरंच आपल्या ह्या अलौकिक यशा साठी सर्वांनी भोसले मॅडम यांचे मनापासून अभिनंदन केले.



