*साने गुरुजींचा ७६वा स्मृतीदिन निमित्त लेख – हिरालाल पगडाल*

मावळ मराठा न्युज -साने गुरुजी म्हंटलं की, धोती सदरा घातलेल्या साध्या भोळ्या शाळा मास्तरांची प्रतिमा समोर येते पण ही प्रतिमा अपूर्ण आहे, साने गुरुजींनी शंभर वर्षांपूर्वी एम. ए . हि पदवी प्राप्त केली होती. त्याकाळात सहजसाध्य नव्हती, या पदवीच्या जोरावर त्यांना मोठ्या अधिकार पदाची नोकरी सहज मिळाली असती पण त्याकडे पाठ फिरवून त्यांनी शिक्षक होणे पसंत केले. साने गुरुजी प्रकांड पंडित होते, क्रांतिकारक होते.*साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील पालगड येथे झाला, आयुष्यभर अज्ञान,विषमता,पारतंत्र्य याच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या गुरुजींनी ११ जून १९५० रोजी स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केले.*साने गुरुजी क्रांतिकारक होते, साने गुरुजी लढवय्ये होते, साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वाला अनेक पदर होते पण त्यांचे व्यक्तिमत्त्व रणझुंजार असतांना, करुणा वात्सल्य नम्रता प्रेम या चौकटीत गुरुजींची प्रतिमा बंदिस्त करण्यात येथील व्यवस्थापती यशस्वी झाले.* साने गुरुजी म्हंटले की, सगळ्यात अगोदर समोर येते ती म्हणजे श्यामची आई. याच श्यामची आई मुळे साने गुरुजींची प्रतिमा मातृहृदयी अशी निर्माण झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page