वायसी क्लासेसने राखली २९वर्षाची यशस्वी परंपरा; इयत्ता १०वी,१२वी सायन्स व १२ वी कॉमर्सचा(१०वर्ष)१००%टक्के निकाल; गुणगौरव सोहळ्याला मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा









मावळ मराठा न्युज – लोणावळा लोणावळा वाय. सी.क्लास हा मागील कित्येक वर्षापासून दरवर्षी लोणावळा परिसरातील शाळांमधील इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आला आहे. यावर्षी वाय. सी.क्लासेस लोणावळा तर्फे आयोजित इयत्ता दहावी मध्ये मिळवलेल्या यशाबद्दल गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दि.७ जून २०२६ रोजी लोणावळा नगरपालिकेचे प्रियदर्शनी संकुल लोणावळा गावठाण येथे आयोजित संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे, गुरुकुल हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ अनुष्का कालगुडे ,जितेंद्र कल्याणजी, एम एन न्यूजचे संपादक ॲड.संजय पाटील,व्ही.पी.एस.चे उपमुख्याध्यापक श्री विजय रसाळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री बबन धिडे तसेच श्री सहादू कालेकर व श्री वसंत कालेकर तसेच पत्रकार सुनील म्हस्के,मावळ वार्ताचे पत्रकार गुरुनाथ नेमाने,लोहगड दर्शनचे संपादक श्री कुमठेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत २०२६ चा गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात वाय.सी. क्लासेसचे संचालक श्री निवृत्ती दुडे यांनी प्रस्ताविकेद्वारे क्लासचा सुरुवातीपासूनचा प्रवास ते आजचे विद्यार्थी आणि आई-वडिलांच्या समोरील आव्हाने या विषयी मार्गदर्शन केले. आजचा काळ हा संघर्षाचा असून त्यांचा सामना कसा करावा? याबद्दल मार्गदर्शन केले तसेच विविध मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना भावी काळासाठी शुभेच्छा तसेच येणाऱ्या काळातील विविध आव्हाने कशी पार करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वाय सी क्लास हा मावळातला एकमेव असा खाजगी क्लास आहे की जो विद्यार्थ्यांच्या गुणांचा गौरव करतो अशा प्रकारचे गौरव उद्गार सर्व मान्यवरांनी कौतुकाने केले. वाय सी क्लासेसचे गेले २९ वर्ष इयत्ता १० वी, १२ वी सायन्स व १२ वी कॉमर्स चा (१०वर्ष)१००% टक्के निकाल लाऊन आपल्या नावलौकिकत भर टाकली आहे. याही वर्षी संकष्टी केदारी हिंदीत राज्यात २री,आदर्श विश्वकर्मा अकाउंट मध्ये राज्यात ३रा,श्रेया खांडेभरड इकॉनॉमिक्स मध्ये राज्यात ४थी,श्रुतिका जाधव हिंदी मध्ये राज्यात ६ वी व श्रेया जायगुडे अकाउंट मध्ये राज्यात ७वी अशाप्रकारे घवघवीत यश मिळविल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला वाय.सी.क्लासेस कडून अथक परिश्रम घेणाऱ्या श्री दीपेश गोणते,मयूर कनगुटकर व उजमा शेख मॅडम या सर्व प्राध्यापक वृंदाचाही यथोचित सन्मान करण्यात आला. परिसरातील सर्व शाळांचे प्रथम तीन क्रमांकातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक सदर कार्यक्रम पाहून भारावून गेले सदर कार्यक्रमाची सुरुवात कु स्वाती कुटे व पायल हमरे यांच्या स्वागत गीताने करण्यात आली त्याचप्रमाणे सूत्र संचालन वाय.सी.क्लासेसच्या विद्यार्थिनी कु. भूमिका जाट, सृष्टी खिरीड यांनी केले प्रा. श्री दीपेश गोणते सर यांच्या नियोजनाला श्री मयूर सर,सौ मालती दुडे ,सौ स्वाती गोणते यांनी सहकार्य करून कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडला वाय.सी. क्लासेसच्या १२वी सायन्स व कॉमर्सच्या सर्व विद्यार्थिनींनी सदर कार्यक्रमासाठी मेहनत घेतली तसेच सदर कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे व पालकांचे आभार कु. प्रगती लंके यांनी मांडले. सदर कार्यक्रमाचे गुणवंत विदयार्थ्यांच्या गुणगौरव चे उत्कृष्ट निवेदन वाय सी क्लासेसच्या उजमा शेख यांनी केलं.



