संतोष घोणे यांना फ्रांस विद्यापीठाची पीएचडी प्रदान



मावळ मराठा न्युज :- पिंपरी(प्रतिनिधी) निगडी येथील संतोष घोणे यांना दि थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस फ्रांस या विद्यापीठाने पीएचडी पदवी बहाल केली. श्री घोणे यांनी बिझनेस मॅनेजमेंट रेफरन्स ह्युमन रिसोर्स ॲंड फॅसिलिटी सर्व्हिसेस या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली . थेम्स विद्यापीठातून श्री संतोष घोणे हे या विषयामध्ये पदवी मिळविणारे भारतातील उद्योजक आहेत. यासाठी प्रा. राकेश मित्तल यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.थायलंड येथे झालेल्या आशिया- पॅसिफिक शैक्षणिक परिषदेत, आदीपू विद्यापीठाचे प्रमुख डॉ जिदप्पा थेवारिन, थेम्स विद्यापीठाचे ॲकॅडमीक संचालक डॉ इर्विन डेलीन टोरस यांच्या हस्ते हि पदवी बहाल करण्यात आली. श्री. संतोष घोणे यांना आशिया पॅसिफिक एज्युकेशन समीट मध्ये आशिया आयकॉनिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री संतोष घोणे तिरुपती ग्लोबल फॅसिलिटी मॅनेजमेंट चे चेअरमन असून ते ह्युमन रिसोर्सेस या क्षेत्रात गेली ३२ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी आजतागायत 300 कंपन्यांना सुमारे ६ हजार कुशल कामगार पुरवठा केला आहे. तसेच ते औद्योगिक कामगार सेवा, सुरक्षा सेवा, कामगार संपर्क आणि प्लेसमेंट सेवा पुरवठा करत आहेत.यावेळी श्री.घोणे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात कंपनी मालक आणि कामगार यांच्यात समन्वय असायला पाहिजे. कुशल कामगारांना नोकरीची संधी मिळत नाही. ज्या कामगारांना नोकरीची संधी मिळते त्यांना कंपनीकडून खूपच अपेक्षा आहेत. यामुळे कामगार आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यात मोठी दरी निर्माण झालेली आहे.कामगारांसाठी असलेली तळमळ, उत्तम समन्वय साधण्याची वृत्ती, कामाचा प्रदीर्घ अनुभव, माणसे जोडण्याची कला आणि समाजाप्रतीची बांधिलकी या श्री घोणे यांच्या गुणांचा या यशामध्ये मोठा वाटा आहे.



