कैवल्यधाम योग संस्थेत रक्तदान शिबीराला चांगला प्रतिसाद, रक्तदात्याला पाच लाख रुपयांचा अपघाती विमा प्रदान








मावळ मराठा न्युज -लोणावळ्यातील जागतिक कीर्ती असलेल्या कैवलधाम योग संस्थेमध्ये नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याला पाच लाख रुपयांचा अपघाती विमा व रक्तदान प्रमाणपत्र देण्यात आले.राष्ट्रीय सेवेअंतर्गत गोवर्धन दास सक्सेरिया कॉलेज ऑफ योगा अँड कल्चरल सायंटिसिस (सांस्कृतिक समन्वय) च्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, राष्ट्रीय सेवा अंतर्गत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले . यश हॉस्पिटल व लायन्स क्लब इंटरनॅशनल लोणावळा यांचे या शिबिराला सहकार्य लाभले. कैवल्यधाम योग संस्थेमधील वशिष्ठ हॉलमध्ये हे शिबिर घेण्यात आले. लोणावळा शहर व परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये सहभाग घेतला. या संदर्भात डॉ हेमंत अगरवाल यांनी रक्तदान श्रेष्ठ दान बद्दल मार्गदर्शन केले.



