लोणावळाचे जेष्ठ समाज सेवक, डॉ. धिरुभाई टेलर कल्याणजी क्रांती सूर्य महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार २०२४ ने सन्मानित

महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्ताने ११ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद हॉल, सदाशीव पेठ पुणे येथे संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सन्मानिय बौध्द धर्मगुरु भन्ते हर्षवर्धन शाक्य क्षमा राव व इतर प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रातील लोकांना” सत्य शोधक समाज प्रबोधन , संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट अँड विन फौंडेशन संस्थेकडून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले . ह्या प्रसंगी लोणावळा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक डॉ. धिरुभाई टेलर, कल्याणजी यांचा शिक्षण क्षेत्रात आपल्या ” डॉ धीरुभाई कल्याणजी यांना ब्राईट फ्युचर कौटुंबिक फिरती आनंदी मोफत शाळा” व्दारा महाराष्ट्रा सहित यु.पी.,एम.पी, ओरीसा,तामीळनाडू,राजस्थान,अश्या विविध ठिकाणाहून बांधकाम क्षेत्रात काम करनाऱ्यान करीता आलेल्या गरीब व होतकरू कामगार कुंटुंबातील लहान मुली-मुले महिलांना शिक्षण क्षेत्रात शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांचा मनात शिक्षणाच महत्व समजावून , त्यांची पिढ्यानंपिढ्या चालत आलेली गरीबी निर्मुलन करण्या करिता शिक्षणाचा आग्रह धरून शिक्षण घ्या व मधेच शिक्षण सोडू नका असे सांगून त्यांना सुशिक्षित केले . आता पर्यन्त धीरूभाईयांनी १७ ते २० शाळा सुरु केल्या आहेत . मुलांच्या जिवन आनंदमय व सुखी करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.आणि म्हणूनच डॉ धीरुभाई यांना हत्या या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य सुत्रधार डॉ. विना खाडीलकर, रश्मी पाटील, श्री जय सिंह हिरे होते. श्री, त्यागराज यांनी उत्तम सूत्रसंचालन केले, त्यांना मिळालेला हा १५३ वा पुरस्कार आहे. मावळ मराठा न्युज परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page