ग दि मा नाट्यगृहामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी – विजय भिसे


मावळ मराठा न्यूज़ -पिंपरी (प्रतिनिधी) आकुर्डी येथे पालिकेने उभारलेल्या गदिमा नाट्यगृहा मध्ये अद्याप सुविधा उपलब्ध नाही. त्या त्वरित उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशन चे अध्यक्ष विजय भिसे यांनी केली. श्री भिसे यांनी कार्यक्रम बुकिंग करण्यासाठी नाट्यगृहाची पाहणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या.पिंपरी चिंचवड नाट्यगृहाचे दिमाखात उदघाटन जरी झाले असले तरी अजूनही तिथे परिपूर्ण सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. पालिकेने मूलभूत सुविधा तरी तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे .कार्यक्रम बुक करण्यासाठी अद्याप नाट्यगृहावर दैनंदिन ऑफिस सुरू झालेले नाही .बुकिंग साठी चौकशी केली असता आयोजकांना पालिकेच्या ब प्रभागातील ऑफिसमध्ये जावे लागते . नाट्यगृहात सर्वत्र धूळ साचलेली असल्याचे दिसते , वातानुकूलित यंत्रणा बंद पडलेली आहे. .नाट्यगृहात अद्याप उपहार गृह सुरू नाही .नाट्यगृह दिशादर्शक फलक रस्त्यांना दिसत नाही .अजूनही कित्येकांना नाट्यगृह नेमके कुठे आहे हे कळत नाही .नाट्यगृहात असलेल्या काही मूलभूत मोठया तांत्रिक त्रुटीदेखील आहेत जसे की ग्रीन रूम ची रचना ,व्ही आय पी कक्ष वगैरे .त्यावर काय उपाययोजना आहे ती देखील तज्ज्ञ मंडळी यांना बरोबर घेऊन करावी .अन्यथा इतकी महागाडी वास्तू धूळखात पडून राहील . याकडे पालिका आयुक्तांनी जातीने लक्ष घालावे , अशी मागणी केली.




