सुक्ष्म योगा फाऊंडेशन,पिंकाथॉन लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने तुंगार्ली धरणावर ध्यान सत्र

मावळ मराठा न्यूज :-सुक्ष्म योगा फाऊंडेशनचे संस्थापक पंकज शर्मा आणि टीम सदस्य रिचा,प्रियांशू गुप्ता आणि हर्षदा कांबळे यांनी पिंकाथॉन लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने तुंगार्ली धरणावर एक दिवसीय ध्यान सत्र आयोजित केले होते सूक्ष्म योगा फोंडेशनच्या सत्रासाठी ५० हून अधिक नोंदणीकृत आणि ४० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.शिनरीन योकू किंवा फॉरेस्ट बाथिंगची जपानी प्रथा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली आहे. हे तणाव संप्रेरक उत्पादन कमी करते,आनंदाची भावना सुधारते आणि सर्जनशीलता मुक्त करते, तसेच हृदय गती आणि रक्तदाब कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि आजारपणातून बरे होण्यास मदत होते. सत्रानंतर ३५ महिलांच्या गटाने आणि सुक्ष्मा योग फाउंडेशनने तुंगार्ली धरण परिसराची स्वच्छता केली.पिंकाथॉन लोणावळ्याच्या वतीने गौरी शाह आणि प्रतिमा पिंकाथॉन सदस्य समन्वय करत होत्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page