ड्रायव्हरांना वर्तन परिवर्तन प्रशिक्षणाची गरज -सूर्यकांत मुळे







मावळ मराठा न्युज नेटवर्क -मार्ग सुरक्षितता स्वतःच्या निमित्ताने अनेक नामांकित उद्योगाला भेटून ड्रायव्हर यांना वर्तन परिवर्तनाचा प्रयत्न विजन सेफ्टी सपोर्टर मिशनचे संचालक सन्माननीय सूर्यकांत मुळे सातत्याने करत आहे निसर्गनिर्मित सजीवांमध्ये प्रामुख्याने मानवाची रचना आणि मानवाची निर्मिती निसर्गाने सुरक्षित केलेली आहे सुरक्षितता एक नैसर्गिक देणगी आहे त्याचे जतन केले पाहिजे सुरक्षितता एक संस्कार आहे तो प्रत्येकात रुजवला पाहिजे सुरक्षितता एक विचार आहे त्याचा प्रसार केला पाहिजे सुरक्षितता एक सवय आहे की प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे सुरक्षितता एक अनुभव आहे तो प्रत्येकाने प्रत्येकाला सांगितलं पाहिजे आणि या राष्ट्राला मानवाला सजीवाला पर्यावरणाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे अपघात आहे सुरक्षितता हा एक मानवी जीवनाचा मार्ग आहे तो प्रत्येकाने अवलंब केला पाहिजे आणि अपघातावर मात करून राष्ट्र सुरक्षिततेवर विजय मिळवला पाहिजे विज्ञान आणि गगन झेप घेऊन अनेक शोध लावून सुरक्षितता जोपासण्याचा प्रयत्न केला असला तरी ड्रायव्हरच्या वर्तन परिवर्तनाशिवाय आपले ध्येय साध्य होणार नाही यासाठी प्रत्येकानी आपल्या संस्थेतल्या प्रत्येक वाहनचालकांना प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या मालाची व रसायनाची वाहतूक करणाऱ्यांना अनेक नामावंत कार्पोरेट सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांची ज्ञान करणाऱ्या कार ड्रायव्हर यांना वर्तन परिवर्तनाचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे म्हणूनच आम्ही गेल्या ४० वर्षापासून लाखो लोकांना वर्तन परिवर्तनाचे प्रशिक्षण देऊन एक नवा इतिहास घडविण्याच्या प्रयत्नात आहोत या प्रत्येकाने सहभागी व्हावे आणि सत्कार्याचे सुरक्षित भागीदारांना बनावे



