मावळ एकता कला मंच आयोजित लोगो अनावरण,कलाकारांचा सन्मान,सादरीकरण आणि दिवाळी साहित्य वाटप उत्साहात संपन्न





मावळ मराठा न्युज- लोणावळा,परिसरातील स्थानीक आणि नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ देणाऱ्या मावळ एकता कला मंचचा लोगो अनावरण सोहळा,कलाकारांचे कला सादरीकरण,कलाकारांचा सन्मान आणि दिवाळी साहित्य वाटप सोहळा नुकताच लोणावळा नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिल्पा कोपरकर,गायन क्षेत्रात प्रिया मेहता,नृत्य क्षेत्रात सुरज सरावते,साहित्य क्षेत्रात कवी मोहन जाधव सिनेदिग्दर्शन क्षेत्रात बल्ली ग्रोव्हर,तर चित्रकला क्षेत्रात विजया नितीन कल्याण यांना शाल सन्मान चिन्ह सन्मान पत्र आणि तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषदेचे मावळ शाखेचे अध्यक्ष,तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सुरेश जी धोत्रे,नाट्यपरिषदेचे खजिनदार अतुल शहा मावळ एकता कला मंच चे अध्यक्ष ऍड संजय पाटील,सचिव सौ ज्योती टोपे,खजिनदार सौ वर्षा येवले,संस्थेचे सदस्य रितेश भोमे,शिल्पा येवले व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी लोणावळ्यातील स्थानिक चिमुकले कलाकार यांनी लावणी,गणेश वंदना आणि सामूहिक नृत्य करुन कार्यक्रमाची रंगत आणली.गायक सुनील म्हस्के यांनी गर्जा महाराष्ट्र नें दमदार सुरुवात केली.यावेळी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नासिर भाई शेख,माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई कल्याणजी,भरत हरपूडे,बिंद्रा गणांत्रा पत्रकार श्रीराम कुमठेकर,बापू पाटील,श्रावणी कामत,डोंगरगाव चे सरपंच सुनील येवले,ऍड गणेश जगताप,जेष्ठ नागरिक संघांचे पांडुरंग तिखे उपाध्यक्ष मृदुला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन रश्मी शिरस्कर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्तविक सौ ज्योती टोपे यांनी केले आणि आभार बापू पाटील यांनी मानले.




