साक्षी देशमाने,शशिकांत भोसले आणि गुरुप्रसाद वासकर ठरले महागायक आणि महागायिका



मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,आधार फाउंडेशन लोणावळा यांच्या वतीनं झालेल्या कोण होणार महागायक ? महागायिका स्पर्धा येथील ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल मोठ्या उत्साहात संपन्न झाली ,प्रकाश पाठारे आणि प्रदीप वाडेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याकरिता परीक्षक म्हणून अनिकेत जवळकर आणि डॉ.अश्विनी रानडेयांनी केले.यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,मारोती तिकोने,मारोती साठे,संजय गोलपकर,राजेश मेहता,उमा मेहता,शिवसेनेचे मच्छिंद्र खराडे,डॉ.खंडेलवाल,दत्तात्रय येवले, ॲड प्रथमेश राजपूत,गोरख चौधरी,सुरेश गायकवाड,मीनाक्षी गायकवाड,वसुधा पाटील,पाठारे आई,आधार फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व संगीत प्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले लोणावळ्यातील गायकांना आधार फाउंडेशन आणि प्रदीप वाडेकर यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.आधार फाउंडेशन गेली ४२ महिने निराधार महिलांना अन्न धान्य व किराणा किट चे वाटप करीत आहेत.प्रकाश पठारे आणि आधार फाउंडेशन ची सर्व टीमने यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कोण होणार महागायक आणि महागायिका यातछोटा गटसाक्षी देशमाने – छोटी महागायिकाझरा खान – उपविजेती ठरली तरउत्तजनार्थ म्हणून पार्थ खंडागळे ,गंधाक्ष नाईक,आर्या बांदल यांना गौरविण्यात आले.यांचे रेशमा प्रदीप यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर५० वयावरील गटात गुरुप्रसाद वासकर – महागायकमंगला राणे – उपविजेती महागायिका ठरल्या आहेत यातउत्तेजनार्थ संध्या अडसूळे,नितीन कल्याण,राजू जगताप,प्रशांत नाईक यांना गौरविण्यात आले.यात मीनाक्षी गायकवाड यांनी परीक्षक ची भूमिका पार पाडली.२० वयावरील गटात शशिकांत भोसले – महागायक तर निलेश सोनवणे उपविजेता ठरला. उत्तेजनार्थ म्हणून किरण कुलकर्णी,अमोल वाडेकर,दमयंती महामुनी,दीपाली कांबळे,संतोषी तोंडे ,सिद्धार्थ कांबळे यांचा गौरव करण्यात आला. तर या सर्वांचे परीक्षक म्हणून अनिकेत जवळकर,डॉ अश्विनी रानडे यांनी काम पाहिले.या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन प्रदीप वाडेकर यांनी केले तर विजेत्यांना उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.तर आभार प्रकाश पाठारे यांनी मानले.




